तुमचा सातबारा भांडवलदारांच्या नावावर करण्याचा मोदींचा डाव- बाळासाहेब थोरात

Balasaheb Thorat

मुंबई : मोदी सरकारने कामगार व शेतकऱ्यांच्या अस्तित्वावरच घाला घातला असून तुमचा सातबारा भांडवलदारांच्या नावावर करण्याचा डाव रचला आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केली. केंद्राच्या कृषी कायद्यांच्या विरोधात आझाद मैदानात आयोजित आंदोलनात ते बोलत होते. ते म्हणालेत, केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत दोन महिन्यांपासून सुरू असलेले आंदोलन इतिहास घडवणारे आहे. या आंदोलनाला काँग्रेससह महाविकास आघाडीतील इतर पक्षांनीही पाठिंबा दिला.

आजच्या आंदोलनात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते. शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्यासोबत शेकापचे जयंत पाटील, मंत्री जितेंद्र आव्हाड, काँग्रेस नेते आणि माजी मंत्री नसीम खान, भाई जगताप, समाजवादी पक्षाचे अबु आझमी, डाव्या पक्षांचे नेते अशोक ढवळे, नरसय्या आडम, अजित नवले, निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, खासदार कुमार केतकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मा. आ. मोहन जोशी, सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, रामकिशन ओझा, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्यासह विविध संघटनांचे नेते व हजारो शेतकरी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER