मोदींचे चित्र आता फक्त नोटांवर यायचे बाकी! राष्ट्रवादीचा टोमणा

PM Narendra Modi - Nawab Malik

मुंबई : निवडणुकीच्या धामधुमीतही बंगालमध्ये कोरोना (Corona) प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. मात्र, लसीकरण प्रमाणपत्रावरील मोदींच्या फोटोने वाद निर्माण झाला होता. तृणमूलने लसीकरण प्रमाणपत्रावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या फोटोवर आक्षेप घेत तक्रार केली. निवडणूक आयोगाने मोदींचा फोटो हटवण्याचा आदेश दिला आहे.

काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने निवडणूक होणाऱ्या राज्यातील पेट्रोल पंपांवरील पंतप्रधान मोदी यांचे फोटो असलेले होर्डिंग्ज काढण्याचे आदेश दिले होते. आता लसीकरण प्रमाणपत्रावरील फोटोही काढण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला दिले आहेत.

यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी फोटो छापण्याच्या स्पर्धेत खूपच पुढे निघून गेले आहेत. सर्व पेट्रोल पंपांवर, रेल्वेस्थानकांवर, विमानतळांवर मोदींचेच फोटो आहेत. जिकडे पहावे तिकडे मोदींचेच फोटो दिसतात! खादीच्या कॅलेंडरवर महात्मा गांधींच्या फोटोच्या जागी स्वतःचा फोटो छापला. आता लसीकरण प्रमाणपत्रावरही मोदींनी स्वतःचा फोटो लावला आहे. हे असेच चालत राहिले तर मोदीजी नोटेवरून गांधींचा फोटो हटवून स्वतःचा फोटो छापतील!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER