
टोरांटो : पंतप्रधान मोदी जागतिक पातळीचे नेते आहेत. कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीबाबत भारताने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीनंतर भारताने अनेक देशांना या लसीचा पुरवठा करून त्यांची कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मदत केली. यामुळे जागतिक पातळीवर मोदी आणि भारताची प्रतिमा उंचावली आहे. भारताने लस देऊन अशीच मदत कॅनडाला केली आहे. यासाठी ग्रेटर टोरोंटो परिसरात पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) भारताचे आभार मानण्याचे फलक लावण्यात आले आहेत!
जगातील विविध देशांना भारत लसींचा पुरवठा करतो आहे. यासाठी केवळ जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) यांनीच नव्हे तर मानवी समाजाच्या उन्नतीसाठी वचनबद्ध असलेल्या व्यक्तींनीसुध्दा भारताचे कौतुक केले आहे. गेल्या आठवड्यात भारताने कॅनडाला कोविशिल्ड लसींचे ५ लाख डोस पाठवले, कॅनेडियन भागीदार ‘व्हॅरिटी फार्मास्युटिकल्स’कडे ही लस पाठवण्यात आली.
काही दिवसांपूर्वी व्हर्च्युअल इंडिया-स्वीडन शिखर परिषदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की आतापर्यंत ५० हून जास्त देशांना ‘मेड-इन-इंडिया’ लस पुरविल्या गेल्या आहेत. येत्या काही महिन्यांत अधिक देशांना लसी पुरवण्याची नवी दिल्लीची योजना आहे.
गेल्या महिन्यात डब्ल्यूएचओने भारताच्या लसीकरणाच्या योजनेचे कौतुक केले होते. “भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरण समानतेला पाठिंबा दर्शविल्याबद्दल धन्यवाद. कोवॅक्स बद्दलची आपली वचनबद्धता आणि कोविड -१९ लसींचे डोस इतर देशांना वितरीत केल्यामुळे ६० पेक्षा जास्त देशांना त्यांचे आरोग्य कर्मचारी आणि इतर प्राधान्य गटांना लसी देण्यास मदत होत आहे. मला आशा आहे की इतर देश आपल्या उदाहरणाचे अनुकरण करतील, असे डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस अॅडॅनॉम घेबेरियसस म्हणाले होते.
कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनीही भारताच्या प्रयत्नांचे कौतुक केले होते. कोविड -१९ विरुद्ध जागतिक लढ्यात वैज्ञानिक नवकल्पना आणि लस उत्पादक क्षमता मध्ये भारताने फार चांगले नेतृत्व केले आहे, असे ते म्हणाले होते. जानेवारीत भारताने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या ‘कोविशील्ड’ आणि भारत सरकारच्या मालकीच्या ‘भारत बायोटेक’ या दोन लसींच्या निर्मितीस मान्यता दिली होती.
Billboards come up in Greater Toronto area thanking PM Narendra Modi for providing COVID-19 vaccines to Canada pic.twitter.com/0AaQysm6O1
— ANI (@ANI) March 11, 2021
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला