मोदींची सभा; सौरव गांगुलीच्या भाजपा प्रवेशाचा मुहूर्त ?

Modi's meeting; Moment of Sourav Ganguly's entry into BJP?

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली हे भाजपामध्ये सामील होणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा जोरात सुरू आहे. ७ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची पश्चिम बंगाल येथे ब्रिगेड ग्राउंडवर जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत सौरव गांगुली(Sourav Ganguly) भाजपात प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवली जाते आहे.

भाजपा पश्चिम बंगाल प्रमुख दिलीप घोष याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात म्हणालेत की, याबद्दल कोणतीही चर्चा झालेली नाही आणि त्याबद्दल मला काही माहिती नाही.

या संदर्भात सौरव गांगुली यांच्याकडूनही अजून काही प्रतिक्रिया आली माही, हे उल्लेखनीय.

 

ही बातमी पण वाचा : ममता बॅनर्जींविरोधात मुख्यमंत्रिपदासाठी दिग्गज क्रिकेटपटूच्या नावाची चर्चा!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER