या चाचणीत मोदींचे नाणे खणखणीत वाजले! राष्ट्रवादीचा टोमणा

Sharad Pawar & PM Modi

कोरोनाचा सामना करण्यात अपयशी ठरलेला पंतप्रधान कोण या सर्वेक्षणात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना सुमारे तब्बल ९० टक्के मत मिळाली. या ऑनलाइन जनमत चाचणीमध्ये सर्वात वाईट कामगिरी करणारा नेता कोण? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने(NCP)ट्विट करून – या चाचणीत अव्वल आलेल्यांना शुभेच्छा! म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोमणा मारला.

अमेरिकेतील ‘द कॉन्व्हर्सेशन’ वेबसाइटने ट्विटरवर जनमत ही चाचणी घेतली. कोरोना काळात सर्वांत सुमार कामगिरी करणारे नेते कोण, असा प्रश्न होता. या चाचणीत मोदींचं नाणे खणखणीत वाजले. सर्वांत वाईट कामगिरीसाठी त्यांना एकूण (७५,४५०) ९० टक्के मत मिळाली. असे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसने केले.

काही दिवसांपूर्वी ‘द डेली गार्डियन’ या लोकल वृत्तपत्राला ग्लोबल भासवून मोदी कसे चांगले काम करतात, हे दाखवायचा प्रयत्न भाजपाने केला. त्या तुलनेत ‘द कॉन्व्हर्सेशन’ हे वृत्तपत्र मोठे आहे. त्यामुळे दखल घेणे क्रमप्राप्त ठरते, असे राष्ट्रवादीने म्हटले आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही. 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button