मोदींचे सात वर्षात २ निर्णय चांगले तर ४ निर्णय वाईट; अरविंद सावंतांची टीका

PM Modi-Arvind Sawant

मुंबई :- मोदी सरकारने ७ वर्ष पूर्ण केले आहेत. यावरून शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी भाजपवर टीका केली. या ७ वर्षात आम्ही मोदींसोबत होतो. या सरकारने गेल्या ७ वर्षात दोन निर्णय चांगले तर चार निर्णय वाईट घेतले. मोदींनी गेल्या सात वर्षात जनतेचा विश्वास गमावला, अशी टीका अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी केली.

अरविंद सावंत यांनी मोदी सरकारच्या (Modi Govt) सात वर्षाच्या कार्यावर भाष्य केले. आम्ही या सात वर्षात काही वर्ष त्यांच्यासोबत होतो. ७० वर्षातही चांगली कामे झाली असेच आम्ही म्हणू. कदाचित आम्ही दोन पाऊल पुढेही असू. या सात वर्षात ३७० कलम रद्द झाले आणि राम मंदिराचा प्रश्न मार्गी लागला, हे दोन निर्णय चांगले झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ही भूमिका सातत्याने रेटली आहे. त्यामुळे या दोन गोष्टी सात वर्षात चांगल्या झाल्या. पण नोटाबंदी, GST, कामगार कायदा आणि कृषी कायदा हे चार निर्णय अतिशय वाईट होते. त्यामुळे सर्वसामान्य जनता होरपळून गेली आहे. नोटाबंदीमुळे बेरोजगारी वाढली आहे. कोरोनामुळे ती शिगेला पोहचली आहे, असे सावंत म्हणाले.

महाराष्ट्रासोबत दुजाभाव
केंद्र सरकार महाराष्ट्राबाबत दुजाभावाने वागत आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मोदी गुजरातला गेले. थोडे पुढे गेले असते तर कोकणची किनारपट्टी दिसली असती. हजार कोटी गुजरातला देणारे मोदी महाराष्ट्रबद्दल एक शब्दही बोलत नाहीत. मोदींनी विश्वास गमावला आहे, अशी टीका सावंतांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button