‘येणार तर मोदीच’ : मोदी सरकारवर केलेल्या टीकेला अनुपम खेर यांचे ट्विट करत प्रत्युत्तर

Pm Modi -Anupam kher - Maharastra Today
Pm Modi -Anupam kher - Maharastra Today

मुंबई : अभिनेते अनुपम खेर आणि ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांच्यातील ट्विटर वाद चांगलाच पेटला आहे . कोरोना काळातील गैरव्यवस्थापनाला केंद्र सरकार जबाबदार आहे, असा आरोप शेखर गुप्ता यांनी केला. त्यावर उत्तर देताना अनुपम खेर यांनी घाबरू नका, येणार तर मोदीच, असे उत्तर दिले आहे.

साठच्या दशकाचा मुलगा म्हणून मी अनेक संकटं पाहिली आहेत. ज्यात तीन पूर्ण युद्धं, अन्नटंचाई, नैसर्गिक आपत्ती यांचा समावेश आहे. फाळणीनंतरचे हे आपल्यावरील सर्वांत मोठे संकट आहे. मात्र भारताने कधीच सरकारचा अभाव पाहिलेला नाही. कॉल करण्यासाठी कोणतेही नियंत्रण कक्ष नाहीत, कोणीही जबाबदारी घेत नाही. हा प्रशासनाचा पराभव आहे, असे म्हणत शेखर गुप्ता यांनी सरकारवर टीका केली. यावर अनुपम खेर यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिले आहे.

शेखर गुप्ताजी, हे जरा अतीच झाले . अगदी तुमच्या स्टँडर्डपेक्षाही. कोरोना ही आपत्ती आहे. संपूर्ण जगासाठी. या महामारीचा सामना आपण यापूर्वी कधीच केला नव्हता. सरकारवर टीका करणे महत्त्वाचे आहे. त्यांच्यावर आरोप, टीका-टिपणी जरूर करा. पण कोरोनाशी सामना करणं ही आपलीही जबाबदारी आहे. तसे तर घाबरू नका. येणार तर मोदीच. जय हो, असे ट्विट अनुपम खेर यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button