मोदी vs बॅनर्जी : मुख्य सचिवांना कार्यमुक्त करू शकत नाही; बॅनर्जींचे पंतप्रधानांना पत्र

Maharashtra Today

कोलकाता : पश्चिम बंगालमधल्या निवडणुका संपल्या आणि ममता बॅनर्जी (Mamata Banejee) पुन्हा सत्तेवर आल्या. बंगालचे मुख्य सचिव अलापन बंडोपाध्याय यांच्या बदलीसंबंधी आता केंद्र आणि राज्य सरकार आमने-सामने आहेत. या संदर्भात बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना पत्र लिहिले आहे.

या पत्रात पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांना कार्यमुक्त करण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. यावरून पुन्हा वाद होण्याचे चिन्हे आहेत. अलापन बंडोपाध्याय हे पश्चिम बंगालचे मुख्य सचिव आहेत. बॅनर्जींनी त्यांची सेवा तीन महिने वाढवण्याची केंद्र सरकारला विनंती केली. ती विनंती मान्यही झाली. अलापन बंडोपाध्याय यांना आज सकाळी १० वाजता दिल्लीला रिपोर्ट करण्याचे आदेश केंद्राकडून देण्यात आले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी पत्रातून मुख्य सचिव बंगालमध्येच राहून कोरोना संकटादरम्यान सेवा बजावत राहतील, असे स्पष्ट केले. ‘यास’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा आणि बचावकार्याची माहिती घेण्यासाठी कलाईकुंडा येथे पंतप्रधान मोदी दाखल झाले. मोदींना मुख्यमंत्री ममता बनर्जी आणि मुख्य सचिवांमुळे अर्धा तास वाट पाहावी लागली.

यावरून केंद्राकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. यावर गृहमंत्री, संरक्षणमंत्र्यांसह अनेक भाजप नेत्यांनी टीकाही केली. यानंतर काही तासांतच केंद्र सरकारकडून पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांच्या बदलीचे आदेश देण्यात आले होते. मुख्य सचिव बंडोपाध्याय यांची बदली करताना केंद्राने कोणतीही सल्लामसलत केली नाही, असा आरोप बॅनर्जींनी केला आहे. केंद्राने एकतर्फी केलेल्या बदलीवर दु:खी असल्याचे ममता बॅनर्जी म्हणाल्या. सध्याच्या कोरोना आणि यास चक्रीवादळ अशा परिस्थितीत मुख्य सचिव बंडोपाध्याय यांना रिलिव्ह करणे शक्य नसल्याचे बॅनर्जींनी केंद्राला कळवले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button