उद्धव ठाकरेंच्या हातात हात घालून मोदी म्हणाले, ‘उद्धव माझा छोटा भाऊ !’

Modi-Thackeray share dais after 28 months

लातूर : महाराष्ट्रात शिवसेना-भाजप यांच्या युतीत मोठा भाऊ कोण आणि छोटा भाऊ कोण, यावरून अनेकदा ठिणग्या पडल्याचं दिसून आलं. मात्र आज लातूरमधील औशामध्ये आयोजित शिवसेना-भाजप महायुतीच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तब्बल अडीच वर्षांनंतर एकाच मंचावर आले. यावेळी हातात हात घालून मोदी आणि उद्धव यांनी मंचावर प्रवेश केला. त्यानंतर मोदी-उद्धव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीमधील प्रमुख नेत्यांनी हात उंचावत महायुतीचा जयघोष केला.

ही बातमी पण वाचा:- महाआघाडीत हिंमत असेल तर, पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करावे – उद्धव ठाकरे

‘शिवसेना पक्षप्रमुख आणि धाकटे बंधू उद्धव ठाकरे’ असा उल्लेख करत पंतप्रधानांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून प्रेरणा घेत, सिद्धेश्वर महाराजांचा आशीर्वाद, असा उल्लेख मोदींनी सुरुवातीलाच केला. लहान भाऊ कोण, मोठा भाऊ कोण, यावरून शिवसेना-भाजपमध्ये युतीपूर्वी झालेली खडाखडी नवीन नाही. अगदी बाळासाहेब ठाकरेंनीही शिवसेना मोठा भाऊ असल्याचं ठणकावून सांगितलं होतं.

त्यानंतर महाराष्ट्रात शिवसेना तर देशात भाजप मोठा भाऊ असल्याचं आधी म्हटलं जायचं. युती होण्यापूर्वी महाराष्ट्रात शिवसेनाच मोठा भाऊ आहे, असे शिवसेना नेते छातीठोकपणे सांगत असतात. भाजपचे नेतेही राज्यभरात आम्ही मोठे भाऊ म्हणून प्रचार करतात. अशातच आज व्यासपीठावर उद्धव ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात ‘नरेंद्रभाई’ असा उल्लेख करून केली; पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्यात भाषणात माझा छोटा भाऊ म्हणून उद्धव ठाकरेंचा उल्लेख केला.

ही बातमी पण वाचा : राज ठाकरेंच्या विरोधात कमेंट करणं पडलं महागात!