‘मोदी टॅक्स’ सरकारने २० लाख कोटी रुपये लुटले; काँग्रेसचा आरोप

PM Narendra Modi - Pawan Khera

दिल्ली :- पेट्रोल (Petrol) शंभरीला टेकले. डिझेलच्या (Diesel) दरातही वाढ सुरूच आहे. यावरून केंद्र सरकारवर (Central Government) टीका करताना काँग्रेसने म्हटले आहे की, गेल्या साडे सहा वर्षांपासून अबकारी कराच्या रुपात लादण्यात आलेला ‘मोदी टॅक्स’ हटवा.

काँग्रेसचे (Congress) नेते पवन खेरा (Pawan Khera) पत्रपरिषदेत म्हणालेत की, मोदी सरकार देशातील फक्त दोन उद्योजकांसाठी काम करते. देशातील नागरिक अबकारी कराच्या रुपात ‘मोदी टॅक्स’ भरते आहे. गेल्या साडे सहा वर्षांपासून लादण्यात आलेला अतिरिक्त ‘मोदी टॅक्स’ हटवला जावा. सरकारने अबकारी कर कमी केला तर पेट्रोलचा दर प्रतिलीटर ६१ रुपये ९२ पैसे तर डिझेलचा दर प्रतिलीटर ४७ रुपये ५१ पैसे असा दावा त्यांनी केला.

खेर म्हणालेत, मे २०१४ मध्ये कच्च्या तेलाची किंमत १०८ डॉलर बॅरल होती. त्यावेळी दिल्लीत पेट्रोलचा दर ७१ रुपये ५१ पैसे होता. १ फेब्रुवारी २०२१ला कच्च्या तेलाची किंमत प्रत्येक बॅरेलला ५४.४१ डॉलर असतानाही राजधानीत पेट्रोलचा दर मात्र ८९ रुपये २९ पैसे इतकाच आहे तर डिझेलचा दर प्रतिलीटर ७९ रुपये ७० पैसे आहे!

मोदी सरकारने इंधनांच्या किंमतीतून देशाचे २० लाख कोटी लुटले असा गंभीर आरोप पवन खेरा यांनी केला. ते २० लाख कोटी कुठे गेले? कोणत्याही क्षेत्रात ते दिसले नाहीत. आपल्या काही मित्रांना फायदा व्हावा यासाठी हा केलेला गुन्हेगारी कट होता असे म्हणू शकतो का? असा प्रश्न खेरा यांनी केला.

ही बातमी पण वाचा : आमदाराच्या राजीनाम्यामुळे या केंद्रशासित प्रदेशात काँग्रेसचे सरकार आले अल्पमतात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER