…मग विदेशवारी करणाऱ्या मोदींनी चौकीदारीच करावी- प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar

उस्मानाबाद :– सत्ताधारी मोदी सरकरने गेली पाच वर्षे देशाला लुटले आहे . या लुटारूंनी नोटाबंदी, जीएसटी आणून नोकरी असणाऱ्या दोन कोटी तरुणांच्या नोकऱ्या घालवल्या आहेत . अशा सत्ताधाऱ्यांना पुन्हा जनतेने थारा देऊ नये. विदेशवारी करणाऱ्या नरेंद्र मोदींना जर चौकीदार व्हायचे असेल तर त्यांनी चौकीदारीच करावी, पंतप्रधान होण्यासाठी खटाटोप करून निवडणूक लढविण्याची काय गरज? असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अर्जुन सलगर यांच्या प्रचारार्थ आंबेडकरांची दर्गाह मदानावर प्रचार सभा झाली. सत्तेत आल्यानंतर जनतेच्या कष्टाचा पैसा मोदींनी नोटबंदीसारखा निर्णय घेऊन लुटला . महाराष्ट्रात सुरू असलेले परिवर्तन मोदींसह अन्य राजकारण्यांच्या पचनी पडत नाही. अशा लुटारूंना सत्तेवरून खाली खेचले पाहिजे. उस्मानाबाद जिल्ह्यातील राजकारण दोन भावांच्या भोवतीच फिरताना दिसत आहे. हे बहुजन समाजाने ओळखले आहे. परंतु आता राजकीय परिस्थिती वेगळी आहे. यामुळे घरातील ही सत्ता उलथवून टाका, असे आवाहनही त्यांनी जनतेला केले आहे . यावेळी आमदार इम्तियाज जलील यांनीही मोदी सरकारवर टीका केली. ज्या मुद्यावर मोदी देशाचे पंतप्रधान झाले, ते मुद्दे बाजूला ठेवून वेगळेच राजकारण सुरू आहे.

ही बातमी पण वाचा :पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेतून खाली खेचा- प्रकाश आंबेडकर

भाजपतील काही पुढारी हे सुशिक्षित बेरोजगारांनी पकोडे विकण्याची भाषा करतात. परंतु वंचित आता मोदींना चाय-चाय करत तर अमित शहांना पकोडे विकत बसविणार असल्याचेही जलील म्हणाले . या सभेत उमेदवार अर्जुन सलगर, एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील, लिंगायत समाजाचे नेते शिवानंद ऐबतपुरे, मिलिंद रोकडे, धनंजय शिंगाडे, अण्णासाहेब पाटील आदींची उपस्थिती होती.