मोदी-शहा हे मोठे नेते आहेत पण अजिंक्य नाही; संजय राऊतांची बोचरी टीका

Sanjay Raut - Amit Shah - PM Narendra Modi
Sanjay Raut - Amit Shah - PM Narendra Modi

मुंबई :- ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका हॅटट्रिकने जिंकल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मोठे नेते आहे, पण अजिंक्य नाही, हे आज बंगालच्या जनतेने दाखवून दिले आहे, अशी बोचरी टीका शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. पश्चिम बंगालच्या निकालाबाबत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

“पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला फक्त बहुमत मिळाला नाही, तर प्रचंड बहुमत मिळाले आहे. ममता बॅनर्जी यांना १२५ जागा सुद्धा मिळणार नाही, निकालानंतर ममतादीदी घरी जातील, असे वातावरण निर्माण झाले होते. पण ममतादीदींनी आपण कोण आहोत, हे दाखवून दिले आहे. जिद्द काय असते हे ममतादीदींकडून शिकण्यासारखे आहे.” असे कौतुक करत राऊतांनी ममतादीदींचे अभिनंदन केले आहे.

“ममतादीदी नंदीग्राममध्येही जिंकतील. यात शंका नाही. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) हे अजिंक्य नेते नाही, पण मोठे नेते आहे. निवडणूक जिंकण्याचे तंत्र त्यांच्याकडे आहे. सत्ता आहे. पण ते अजिंक्य नाही, हे आज पश्चिम बंगालच्या निवडणुकीतून दिसून आले.” असा टोला राऊतांनी लगावला. तसेच “बेळगावमध्ये आम्ही मराठी माणसासाठी मैदानात उतरलो होतो. आम्ही त्यांच्यासाठी लढलो. निकाल नंतरचा विषय, पण मराठी माणसे या निमित्ताने एकत्र आली.” असे राऊत म्हणाले.

आज सकाळी संजय राऊत माध्यमांशी बोलताना पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी जिंकतील, असे संकेत दिले होते. तसेच, बॅनर्जी यांची सत्ता येणार हे स्पष्ट दिसत आहे. संपूर्ण निकालानंतर ममता बॅनर्जी सत्ता स्थापन करतील. ममतादीदीने ज्या पद्धतीने नियोजन केले, त्याचे कौतुक केले पाहिजे. भाजपने सगळी ताकदपणाला लावली होती. नरेंद्र मोदी हे बंगालमध्ये तळ ठोकून होते. अनेक केंद्रीय नेते हे बंगालमध्ये प्रचाराला आले. भाजपच्या संख्या नक्की वाढत आहे. लोकसभेतही जागा वाढेल. त्यांची मेहनत आहे, इन्वसेमेन्ट सुद्धा जास्त आहे. कोणत्याही पक्षाची जागा वाढत असली, तरी कोरोनाची संख्या महत्त्वाची आहे. असा टोला राऊतांनी लगावला होता.

ही बातमी पण वाचा : बेळगाव पोटनिवडणुक : फडणवीसांच्या प्रयत्नाने पुन्हा भाजप, तर संजय राऊत तोंडघशी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button