मोदी-शहा सरकारने केला निवडणुकीच्या भीतीमुळे व्याजदरात कपात; दिग्विजय सिंगचा हल्लाबोल

Modi - Sahah - Digvijay Singh - Maharastra Today

नवी दिल्ली : केंद्र सरकारने ३१ मार्च रोजी छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु या निर्णयाने सर्वसामान्यांना झटका बसला. सर्व स्तरातून केंद्र सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यानंतर केंद्र सरकारने यू टर्न घेऊन निर्णय परत घेण्याची घोषणा केली. याबाबतची माहीती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. यावरून आता केंद्र सरकारवर टीका केली आहे. पाच राज्यात होत असलेल्या निवडणुकीमुळे मोदी सरकारने आदेश मागे घेतल्याचे विरोधकांनी निशाणा साधला आहे.

काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. “मोदी-शहा-भाजपा सरकारच्या कार्यकाळात मजूर आणि सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांवरच संकट कोसळताना दिसत आहे. त्यांच्या बचतीच्या व्याजदरात कपात करण्यात आली आहे. निवडणुकीच्या भीतीमुळे मोदी-शहा-निर्मला सरकारने गरीब आणि सर्वसामान्य माणसांच्या अल्पबचत योजनांवरील व्याजदर कपातीचा निर्णय बदलला आहे. धन्यवाद… पण निवडणुका पार पडल्यानंतरही आपण व्याजदरात कपात करणार नाही, असे वचन निर्मलाजी यांनी द्यावे” असेदेखील दिग्विजय सिंह म्हणाले.

त्याचबरोबर, “ही ऑर्डर कोणाच्या “ओव्हरसाइट” कडून आली आणि लोकांना ऑर्डर देण्यासाठी भाजपा प्रयत्न करीत असताना ही ऑर्डर कशी निघाली, हे निर्मलाजींनी आम्हाला सांगायला हवे.” असे ट्विटच्या माध्यमातून दिग्विजय यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button