दिल्लीतील वादळ शमवण्यासाठी मोदी-शाहांचा खास मोहरा डोवाल मैदानात

modi-shah give-delhi-violence-responsibility-on-nsa-ajit-doval

नवी दिल्ली : दिल्लीतील शाहीनबाग मधील आंदोलन संपुष्टात आल्यानंतर ईशान्य दिल्लीत सीएए विरोधातील आंदोलन चांगलेच चिघळले आहे. सीएए विरोधातील दिल्लीतील आंदोलनाने हिंसाचाराचे रूप घेतले. या हिंसाचारात आज (26 फेब्रुवारी) सकाळपर्यंत 20 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील हे वादळ शमवण्यासाठी मोदी शाहांचे खास डोवाल यांना दिल्लीच्या मैदानात उतरवले आहे. दिल्ली येथील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. दिल्लीच्या सर्व परिस्थितीची संपूर्ण माहिती ते मंत्रिमंडळ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना देणार आहेत.

अजित डोवाल यांनी काल (25 फेब्रुवारी) रात्री दिल्ली पोलीस आयुक्त अमूल्य पटनायक आणि विशेष आयुक्त श्रीवास्तव यांच्यासोबत जाऊन जाफराबाद, सीलमपूर या हिंसक विभागाचा दौरा केला. तसेच डोवाल यांनी स्थानिकांशी चर्चा केली.

डोवाल यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत मीटिंग घेतली. त्यात हिंसा झाल्यास कडक कारवाई करा असा आदेश दिला आहे. तसेच पर्यायी पोलीस आणि निमलष्कर बल तैनात केले जातील, असंही डोवाल यांनी अधिकाऱ्यांना सांगितले, अशी माहिती मिळत आहे.

यासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज बैठक होणार आहे. या बैठकीत अमित शाह दिल्लीच्या परिस्थीतीवर चर्चा करणार आहेत. यादरम्यान पोलिसांच्या रणनितीवरही चर्चा केली जाणार आहे.

गृहमंत्री अमित शाह यांनी काल सकाळी शाहदरा हिंसामध्ये जखमी झालेल्या डीसीपी अमित शर्मा यांच्या कुटुंबासोबत चर्चा केली. शाह यांनी शर्माच्या तब्येतीबद्दल तसेच परिवाराची माहिती घेतली.

नवी दिल्ली हिंसाचार; दिसताच क्षणी आंदोलकांना गोळी मारण्याचे पोलिसांना आदेश