मोदी-शहांनी आजपर्यंत दादागिरीच केली, मग ममतांनी केली तर बिघडलं काय? – राज ठाकरे

modi-shah-alway-done-dadagiri-then-whats-wrong-with-mamata-banerjee-raj-thackeray

मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जे करत आहेत ते योग्यच आहे. आजवर या दोघांनी (मोदी-अमित शहा) दादागिरीच केली आहे. मग ममतांनी केली तर बिघडलं काय? अमित शहांना कळू दे दादागिरी काय असते ते, असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे.

राज ठाकरे यांच्या हस्ते आज (ता.१८) दादरमधील आंबा महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व भाजप यांच्‍यात रंगलेल्‍या वादावर भाष्‍य केले. यासोबतच त्‍यांनी मोदींच्या कालच्‍या पत्रकार परिषदेवरही निशाणा साधला.

ही बातमी पण वाचा:- मोदींना गरज लागली तरच दिल्लीत ‘वाघां’ची डरकाळी 

”मोदींच्या कालच्या पत्रकार परिषदेबद्दल न बोललेलं बरं; कारण तेच (मोदी) काहीच बोलले नाहीत, तर मग आपण काय बोलायचं? पाच वर्षांत तुम्ही पत्रकांसमोर कधीच आले नाहीत. पंतप्रधान पत्रकारांना इतकं का घाबरतात, याचं उत्तर त्यांनी स्वत:च द्यावं. असं त्यांनी काय केलं ज्यामुळे ते एवढं पत्रकारांपासून पळत आहेत?” असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.