मोदी की राहुल?

प्रचार संपला, पण प्रश्न कायम

PM vs Rahul

Badge

१७ व्या लोकसभेसाठी प्रचाराची गेली दोन महिने चाललेली रणधुमाळी आज थांबली. रविवारी अखेरच्या टप्प्याचे मतदान आहे. २३ मे रोजी मतमोजणी आहे. ‘मोदी विरुद्ध सारे’ असेच ह्याही निवडणुकीचे स्वरूप होते. मागच्या निवडणुकीत मोदीलाट स्पष्ट दिसत होती. यावेळी प्रचार संपला तरी हवा कळत नाही.

आम्ही ३०० पेक्षा जास्त जागा घेऊन पुन्हा सत्तेत येणार, असा दावा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी केला. विरोधक तर पहिल्या दिवसापासूनच जिंकल्याच्या मूडमध्ये आहेत. अंडर करंट असेल तर काहीही होऊ शकते. दोन महिन्यांच्या रणधुमाळीतही हवा लक्षात येत नसल्याने सारेच गोंधळले आहेत. मोदी नाही तर कोण? ह्या प्रश्नाचे उत्तर लोकांना सापडले असेल का?

ही बातमी पण वाचा : नियती उद्या चालून हिशेब तर चुकता करणार नाही ना ??

प्रचाराच्या नावाने यावेळी जे झाले ते भयंकर होते. उमेदवार कशाचा प्रचार करत होते ते अखेरपर्यंत कळले नाही.

साध्वी प्रज्ञा असो वा नवज्योत सिद्धू … सनसनाटी बोलून चॅनेलवर चमकायचे हाच एक कलमी कार्यक्रम दिसला.

सामान्य माणसाचे प्रश्न बाजूला पडले आणि भलतेच प्रश्न चर्चेत आले. पुलवामा हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीने भाजपला मदतीचा हात दिलेला दिसतो. ‘चौकीदार चोर है’चा जप चालवून राहुल गांधी यांनी काय मिळवले? हे कळायला मार्ग नाही. प्रियंका गांधी यांना आणण्यात थोडा उशीर झाला. ममता, मायावती, राहुल वेगवेगळे लढले. आता निकालानंतर एकजूट व्हायचे विरोधकांचे प्रयत्न सुरू आहेत; पण ते अवघड आहे. प्रत्येकालाच पंतप्रधान व्हायचे आहे.

थोड्या जागा कमी पडल्या तरी मोदी हात मारतील. तुम्ही पाहाल. शरद पवारही, तशी वेळ आली तर मोदींच्या पंगतीत येऊन बसतील. स्थिर सरकार कुणाला नको असते?

ही बातमी पण वाचा : पराभवाचे सुतोवाच

ही बातमी पण वाचा : नरेंद्र मोदींना मानसिक पराभव मान्य : राज ठाकरे