दुस-यांदा कार्यकाळ पूर्ण करणारे नरेंद्र मोदी देशातील तिसरे पंतप्रधान

Narendra Modi

नवी दिल्ली (आयएएनएस) : 2019 च्या सार्वत्रिक निवडणूकीतील भक्कम विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसरे पंतप्रधान आहेत कि ज्यांनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि मनमोहन सिंग यांच्यानंतर आपला पाचवर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आणि परत सत्तेत आले. पं. नेहरू हे स्वतंत्र भारतातील पहिले पंतप्रधान होते. कि ज्यांनी 1951, 1957 आणि 1962 साली काँग्रेसचे नेतृत्व करत विजय मिळवला होता.

पंडित नेहरू यांचा मृत्यू मे 1964 रोजी पंतप्रधान पदावर असताना झाला होता त्यानंतर लाल बहादूर शास्त्री हे देशाचे पंतप्रधान झाले होते. शास्त्री कधीही सार्वत्रिक निवडणकीला सामोरे गेले नाही. तेसुध्दा पदावर असताना जानेवारी 1966 साली ताश्कंद करारावर सह्या केल्यानंतर मरण पावले. 1965 च्या भारत -पाकिस्तान युद्धानंतर 1965 साली उपखंडातील शांततेसाठी हा करार झाला होता.

त्यानंतर नेहरू यांची कन्या इंदिरा गांधी या सूचना व प्रसारण मंत्री झाल्या. त्यानंतर त्या पंतप्रधान झाल्या. त्यांनी 1967 साली सार्वत्रिक निवडणुकीत विजय मिळवला.

इंदिरा गांधी यांनी एक वर्ष आधीच म्हणजे 1971 साली निवडणुका घेतल्या आणि त्यात त्यांना निर्णायक बहुमत मिळाले. हा त्यांचा सैनिकी विजय होता. कारण त्यांनी पाकिस्तानी सैन्याला पछाडत स्वतंत्र बांगला देशाची निर्मिती केली.

चार वर्षांनंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाने निवडणूकीत गैरप्रकार केल्याच्या आरोपाच्या आधारावर विरोधकांनी त्यांच्यावर हल्ला चढवत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यानंतर इंदिरा गांधी यांनी 1975 साली आणिबाणी घोषित केली. यामुळे 1976 साली होणे असलेल्या सार्वत्रिक निवडणूका झाल्या नाहीत.

इंदिरा गांधी यांनी 1977 साली आणिबाणी हटवली आणि सार्वत्रिक निवडणुका घेतल्या. आणिबाणीचा विरोध करणारे सर्व राजकीय पक्ष एकत्र आलेत आणि त्यांनी जनता पार्टी नावाचा पक्ष स्थापन केला आणि सत्ता मिळवली.

हा प्रयोग दोन वर्ष चालला आणि इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने परत 1980 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत विजय मिळवला.

यानंतर 1984 साली इंदिरा गांधी यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर त्यांचे पुत्र राजीव गांधी पंतप्रधान झाले. त्यांनीही लवकरच त्याच वर्षी निवडणूका घेतल्या आणि काँग्रेस बहुमतानी परत सत्तेत आली पक्षाने 533 पैकी 414 जागा जिंकल्या होत्या.

तथापि, 1989 मध्ये बोफोर्स तोफा सौद्याप्रकरणात काँग्रेसने सत्ता गमावली. आणि त्यावेळी जनता दलाचे पंतप्रधान व्ही. पी. सिंह झाले. हे सरकार भारतीय जनता पार्टी आणि डाव्यांच्या कुबड्यांवर टिकून होते. भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रा काढली आणि देशभरात तनाव निर्माण झाला. भाजपने सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याने सरकार कोसळले.

यानंतर काँग्रेसने चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखालील सरकारला रोखले आणि 100 दिवसांचे हे सरकार कोसळळे. राजीव गांधी यांची हेरगिरी करण्याचा सरकारवर आरोप होता.

निवडणुका 1991 साली घेण्यात आल्या. या प्रचाराच्या दरम्यान राजीव गांधी यांची हत्त्या करण्यात आली. यानंतर सहानुभुतीच्या लाटेवर स्वार होत काँग्रेसने परत सत्ता मिळवली.

पी. व्ही नरसिंह राव पंतप्रधान झाले आणि त्यांनी पूर्णकाळ सत्ता चालवली. भ्रष्टाचाराच्या आरोपाखील काँग्रेसने 1996 साली पुन्हा सत्ता गमावली.

त्यानंतर अटल बिहारी बाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार सत्तेत आले. परंतु हे सरकार फक्त 13 दिवसच चालले. कारण हे सरकार लोकसभेत बहुमत सिद्ध करू शकले नाही.

पंतप्रधान एच डी देवेगौडा यांच्या पंतप्रधानपदाच्या अंतर्गत संयुक्त आघाडीचे सरकार पहिले सरकार स्थापन झाले. त्यानंतर इंद्रकुमार गुजराल पंतप्रधान जाले.

आघाडीचा हा प्रयोग दोन वर्ष चालला आणि 1998 साली पुन्हा निवडणुका घेण्यात आल्या. .

अटल बिहारी बाजपेयी पुन्हा पंतप्रधन झाले आणि भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीए ही आघाडी अस्तित्वात आली. परंतु एकाच वर्षात ती कोसळळी. यानंतर भाजपने पुन्हा 1999 च्या निवडणुकीत सत्ता प्राप्त केली.

इंडिया शायनिंगच्या लोकप्रिय घोषणेवर स्वार होत भाजपने प्रचार केला 2004 च्या काही महिने अगोदर निवडणूका झाल्यात. मात्र त्यात त्यांना सत्तेबाहेर जावे लागले.

मनमोहन सिंग पहिल्यांदा पंतप्रधान झाले आणि 16 मे 2019 रोजी काँग्रेसने सत्ता मिळवली.

नरेंद्र मोदी यांच्या लाटेवर स्वार होत भाजपने 2014 साली 543 जागा असलेल्या लोकसभेत 282 जागा मिळवल्या. आणि नरेंद्र मोदी भारताचे 14 वे पंतप्रधान झाले. त्यांनी 26 मे रोजी शपथ घेतली.

2019 साली भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचे आघाडीचे नरेंद्र मोदी दुस-यांदा पंतप्रधान होत आहेत.