मोदींनी सशक्त नेतृत्वाच्या बळावर भारताला एक मजबूत राष्ट्र बनवले : अमित शहा

PM Narendra Modi - Amit Shah

नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील NDA सरकारला सत्तेत दुसऱ्यांदा येऊन सात वर्षे  पूर्ण झाली  आहेत. वर्ष २०१४मध्ये आजच्याच दिवशी पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. या निमित्ताने भाजपा (BJP) नेत्यांकडून सरकारच्या कामांना उजाळा देण्याचा प्रयत्न होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी ट्विट करून भावना व्यक्त केल्या आहेत. याचबरोबर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (JP Nadda) यांनीही ट्विट करून मोदींचे अभिनंदन केले आहे.

“मागील सात वर्षांत देशातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेवा आणि सर्मपणावर विश्वास दाखवला आहे. यासाठी मी देशवासीयांना नमन करतो. मोदीजींच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आम्ही प्रत्येक संकटावर विजय मिळवून भारताच्या विकासाचा गाडा अखंडितपणे पुढे घेऊन जाऊ, याचा पूर्ण विश्वास आहे. या सात  वर्षांत मोदीजींनी देशहिताला सर्वोच्च मानून दृढनिश्चय आणि सर्वस्पर्शी व कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून गरीब, शेतकरी आणि वंचित वर्गांना विकासाच्या मुख्य धारेशी जोडले. त्यांचे जीवनमान उंचावले. याचबरोबर आपल्या सशक्त नेतृत्वाच्या बळावर भारताला एक मजबूत राष्ट्र बनवले.” असे मत अमित शहा  यांनी ट्विट करून व्यक्त केले.

आजचा दिवस सेवादिन
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनीही ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. “सरकारला सात वर्षे  पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन आणि एनडीए परिवाराला शुभेच्छा. आदरणीय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मोदी सरकारची सात  वर्षे पूर्ण झाली. भाजपा आज हा दिवस सेवादिन म्हणून साजरा करणार असून एक  लाख गावांमध्ये सेवा देणार आहे. याच अनुषंगाने आज मदत सामग्री घेऊन दिल्लीला रवाना झाली आहे.” असे नड्डा म्हणाले.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button