मोदी दिवसाचे २४ तास खोटं बोलतात, केव्हाही टीव्ही ऑन करा आणि बघा : राहुल गांधी

Rahul Gandhi

कामरूप : आसाम विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला. त्यानंतर भाजप आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी एका जनसभेला संबोधित केले. यावेळी राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर आणि भाजपावर हल्लाबोल केला आहे.

माझे नाव नरेंद्र मोदी नाही

आसाममध्ये २७ मार्च रोजी विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला. पहिल्या टप्प्यात भरघोस मतदान झाले. यानंतर आता दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. राहुल गांधी यांची कामरूप येथे प्रचारसभा झाली. “मी इथे तुमच्याशी खोटे बोलायला आलेलो नाही. कारण माझे नाव नरेंद्र मोदी नाही. शेतकऱ्यांविषयी, आसामविषयी किंवा अन्य कोणत्याही विषयावर तुम्हाला खोटे ऐकायचे असेल, तर तुम्ही टीव्ही सुरू करा आणि नरेंद्र मोदींचे तोंड बघा. ते दिवसाचे २४ तासही खोटे बोलतात.” अशी बोचरी टीका राहुल गांधी यांनी प्रचारसभेत केला.

आसामसाठी काही करत नाही

भाजप रोजगार देण्याचा प्रयत्न करत नाही. युवकांना मदत करत नाही. आसामवर आक्रमण करते. सीएए हा कायदा आसामवरचे आक्रमण आहे. सीएए केवळ एक कायदा नाही, तर, तुमचा इतिहास, भाषा आणि बंधुत्वावर हल्ला आहे. त्यामुळेच आम्ही त्याला विरोध करत आहोत.” अशीदेखील टीका राहुल गांधी यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button