कृषी क्षेत्राच्या विकासाआड येणाऱ्या भिंती पाडतो आहे : मोदी

PM_Narendra_Modi

दिल्ली : कृषी क्षेत्राच्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व भिंती मी पाडतो आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणालेत. ते FICCI च्या ९३ व्या वार्षिक बैठकीचे व्हर्च्युअल उद्घाटन कार्यक्रम बोलत होते.

गेल्या काही दिवसांपासून नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आदोलन सुरू आहे. हे कायदे मागे घ्या, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. या संदर्भात नरेंद्र मोदी यांनी यावेळी नव्या कृषी कायद्यांची पाठराखण केली. कृषी कायद्यात करण्यात आलेल्या सुधारणांवर भाष्य करत त्यांनी या कायद्यांचा शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याची ग्वाही दिली.

ते म्हणालेत, कृषी क्षेत्र आणि त्याच्याशी निगडीत अन्य क्षेत्रांमध्ये पायाभूत सुविधा, फूड प्रोसेसिंग, साठवण, कोल्ड चेन यामध्ये अनेक अडथळे होते. यांच्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व भिंती हटवल्या जात आहेत. सर्व समस्या दूर केल्या जात आहेत. या सुधारणांनंतर शेतकऱ्यांना नवे बाजार मिळतील, पर्याय उपलब्ध होतील, तंत्रज्ञानाची मदत मिळेल. देशातील कोल्ड स्टोरेजच्या सोई – सुविधांमध्ये आधुनिकीकरण होईल. यामुळे सर्वाधिक गुंतवणूक कृषी क्षेत्रात होईल. याचा सर्वाधिक फायदा शेतकऱ्यांनाच होणार आहे.

“शेतीमध्ये खासगी क्षेत्राकडून जेवढी गुंतवणूक व्हायला पाहिजे होती ती करण्यात आली नाही. खासगी क्षेत्राने कृषी क्षेत्रावर हवे तसे काम केले नाही. कृषी क्षेत्रात ज्या खासगी कंपन्या चांगले काम करत आहेत त्यांनी अधिक चांगले काम करण्याची गरज आहे,” असे ते म्हणाले. भारतातील बाजारांचे आधुनिकीकरण होते आहे. देशात सर्वत्र सुधारणा करण्यात आल्या आहेत. आज भारतात कॉर्पोरेट टॅक्स जगात सर्वात कमी आहे. देश प्रगतीपथावर आहे. जेव्हा एक क्षेत्र विकसित होते तेव्हा त्याचा इतर क्षेत्रांवरही सकारात्मक परिणाम होतो, असे मोदी म्हणाले.

“आपण २०-२० सामन्यांमध्ये सर्वकाही वेगाने बदलताना पाहतो. २०२० या वर्षाने सर्वांवर मात केली आहे. या काळात आपल्या देशाने आणि संपूर्ण जगाने जे चढउतार पाहिले ते काही वर्षांनी आपण आठवले तरी त्यावर विश्वास ठेवने कठीण होईल. ज्या वेगाने परिस्थिती बिघडली त्याच वेगाने ती सुधारतही आहे. महासाथीदरम्यान भारताने नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य दिले. अनेकांचे जीव आपण वाचवले. आज त्याचा परिणाम संपूर्ण देश आणि जग पाहत आहे” असे ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER