चंद्रकांत पाटलांना राष्ट्रवादीचे उत्तर : कलामांच्या राष्ट्रपती होण्याशी मोदींचा काहीही संबंध नाही, उलट…

Nawab Malik-Chandrakant Patil

मुंबई : “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ए. पी. जे. अब्दुल कलाम (Abdul Kalam) यांना राष्ट्रपती केलं.”, असं अजब विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं. त्यानंतर चंद्रकांत पाटलांच्या या विधानाची राष्ट्रवादी कॉंग्रेसने दखल घेतली व त्यांना माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या राजधर्म पाळण्याच्या सल्ल्याची आठवण करून दिली.

“अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती करण्याचा निर्णय एकमताने झाला होता. त्यात नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) सहभाग नव्हता; उलट त्यावेळी अटलजी मोदींना राजधर्म काय याचा धडा शिकवत होते. ” असा टोला अल्पसंख्याक नेते आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी लगावला.

नवाब मलिक म्हणाले, कलाम जेव्हा राष्ट्रपती झाले; तेव्हा अटलजी सत्तेत होते. कलाम यांना राष्ट्रपती करण्याचा निर्णय एकमताने झाला होता. त्यामध्ये नरेंद्र मोदींचा सहभाग नव्हता, उलट त्या काळात अटलजी मोदींना राजधर्म काय? याचा धडा शिकवत होते. ” अशी टिप्पणी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केली आहे.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
पुण्यातील युवा वॉरियर्स अभियानात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी देशभक्त मुस्लिम आणि देशद्रोही मुस्लिम यांच्यातला फरक समजावून सांगताना काश्मीरमध्ये बॉम्बस्फोट करणारा मुस्लिम देशद्रोही तर देशासाठी झटणारा मुस्लिम देशभक्त असल्याचं सांगितलं. तसंच आपला सगळ्या मुस्लिमांना विरोध नाही. तर देशद्रोही मुस्लिमांना विरोध असल्याचं सांगितलं. मात्र काही जण नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध काही तरी काळंबेरं पसरवत असतात. पण अब्दुल कलाम यांच्यासारख्या कर्तृत्ववान माणसाला, संशोधक माणसाला नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती केलं, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER