मोदी सरकार शोधणार औरंगजेबाच्या भावाची कबर

Aurangjeb brother

नवी दिल्ली: औरंगजेबने मुघल बादशाह शाहजहाचा मोठा मुलगा दारा शुकोहला ठार करून गादीच्या रक्तरंजित लढाईत बाजी मारली. आता त्याच दारा शुकोहची कबर मोदी सरकार शोधणार आहे. दारा शुकोहने गीता या हिंदूंच्या धार्मिंक ग्रंथाचा फारसी भाषेत अनुवाद केला होता. याशिवाय 52 उपनिषदांचाही अनुवाद केला होता. दाराने हिंदू आणि मुस्लिम परंपरांमध्ये साम्य शोधण्याचा प्रयत्न केला होता.

कबर शोधण्याचे काम सोपे नाही कारण जिथे दारा शुकोहची कबर असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तिथे अनेक कबरी आहेत. त्यावर कोणाचेही नाव किंवा इतर उल्लेख नाही. केंद्र सरकारने दारा शुकोहची कबर शोधण्यासाठी 7 सदस्सीय समिती स्थापन केली असून या समितीला तीन महिन्यांचा वेळ देण्यात आला आहे.

दिल्लीतील हुमायुच्या कबरीच्या परिसरात असण्याची शक्यता आहे. भारतीय पुरातत्व विभागाकडून दारा शुकोहच्या कबरीचा शोध घेतला जाणार आहे. यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीत आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे संचालक टी जे अलोन हे अध्यक्ष आहेत. त्याशिवाय पुरातत्व अभ्यासक आर एस बिश्त, सईद जमाल हसन, के एन दिक्षित, बी आर मानी, के के मुहम्मद, सतिश चंद्रा, बी एम पांडे हे सदस्य आहेत.

दारा शुकोहचा मृत्यू 30 ऑगस्ट 1659 मध्ये झाला होता. शाहजहानचा लाडका असलेल्या दारा शुकोहची ओळख उदारमतवादी आणि विचारवंत अशीच होती. शाहजहानंतर गादीसाठी संघर्ष झाला त्यात दारा शुकोहकडे लहान भाऊ औरंगजेबाच्या तुलनेत जास्त सैन्य होते. मात्र राजकीय डावपेचांची कमतरता आणि विश्वासू लोकांनी दिलेल्या दग्यामुळे दारा शुकोह