मोदी सरकारचे लसीकरण धोरण अयशस्वी, याला जबाबदार कोण? प्रियंका गांधींचा सवाल

Priyanka Gandhi-PM mod

नवी दिल्ली :- देशातील कोरोना (Corona Virus) रुग्ण संख्येने दोन कोटींचा टप्पा पार केला आहे. या संकटामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी अनेक राज्यांत  लॉकडाऊन (Corona Lockdown) लावण्यात आला आहे. तरीही रुग्ण आणि मृतांच्या संख्येत वाढ होताना दिसत होती. देशात लसीकरण सुरू आहे. या दरम्यान काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी लसीवरून मोदी सरकारवर (Modi Govt) जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून “जबाबदार कोण?” असे म्हणत काही प्रश्न विचारले आहेत.

“कोरोनाच्या सुरुवातीपासूनच कोरोना लस सर्वसामान्यांचे जीवन वाचविण्याच्या साधनाऐवजी पंतप्रधानांच्या वैयक्तिक प्रसिद्धीचे साधन बनले. जगातील सर्वांत मोठा लस उत्पादक देश आज इतर देशांच्या लसीच्या देणग्यांवर अवलंबून आहे. आज भारताच्या १३० कोटी लोकांपैकी केवळ ११ टक्के  लोकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे आणि ३ टक्के टक्के पूर्ण लसीकरण झाले आहे. मोदीजींच्या (PM Modi) लस उत्सवाच्या घोषणेनंतर गेल्या एका महिन्यात लसीकरण ८३ टक्के घटले. आज मोदी सरकारने देशाला लसीच्या कमतरतेच्या दलदलीत ढकलले आहे. या लसींच्या कमतरतेमागे सरकारचे अयशस्वी लसीकरण धोरण असल्याचे दिसून येते. याला जबाबदार कोण?” असा प्रश्न प्रियंका यांनी उपस्थित केला आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button