कंगना रणौतला मोदी सरकार पुरवणार Y श्रेणीतील सुरक्षा ; अमित शहाचे मानले आभार

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतला आता मोदी सरकारकडून Y दर्जाची सुरक्षा देण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर कंगनाने गृह मंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहे .

दरम्यान अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूनंतर अनेक वक्तव्यांमुळे अभिनेत्री कंगना रणौत चर्चेत आली आहे. कंगनाने नुकतेच ट्वीट करत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. तिने या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत यांनी मला जाहीरपणे धमकी दिली आहे आणि मुंबईत न परतण्यास सांगितले आहे. आधी मुबंईच्या रस्त्यावर आझादी ग्राफिटीज आणि आता जाहीर धमकी मिळते आहे.

ही मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटत आहे?’ असा प्रश्न कंगनाने उपस्थित केला.