मोदी सरकारचा ‘तो’ निर्णय अनुकूल, पंतप्रधानच्या आवाहनाला शरद पवारांची साथ

Sharad Pawar & PM Modi

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी इथेनॉल निर्मिती करण्याचं आवाहन केलं आहे. आम्ही केंद्र सरकारच्या या आवाहनाचा अभ्यास केला आणि इथेनॉल निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितले . ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते .

यावर्षी ऊसाचं क्षेत्र वाढले , त्यामुळे यावेळी आणि पुढील वर्षी या ऊसाचं गाळप कसं करायचं हा यक्ष प्रश्न आहे. त्यामुळे 25 ते 30 टक्के साखर उत्पन्न कमी करुन त्याऐवजी इथेनॉल निर्मिती करण्याचा निर्णय आहे. केंद्र सरकारचे याबद्दलचे धोरण अनुकूल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही इथेनॉल निर्मिती करण्याचे आवाहन केले आहे. त्यालाच आम्ही प्रतिसाद दिला आहे , असे पवार म्हणाले .

तसेच केंद्र सरकारच्या कृषी धोरणाबाबत आमची नाराजी आहेच . आमच्या पेक्षाही पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात जास्त नाराजी आहे. लोक रस्त्यावर उतरले आहेत. केंद्र सरकार जे सांगतंय की आम्ही बाजारपेठ खुली केलीये यामध्ये काही विशेष नाही. पण केंद्र सरकारचे याबद्दलचे धोरण याच्या उलट असल्याचे शरद पवार म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER