
नवी दिल्ली : जानेवारी महिन्यामध्ये कोरोना (Corona) संसर्ग काहीसा नियंत्रणात आला असता फेब्रुवारी महिन्यापासून रुग्णांची संख्या वाढू लागली. या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आले. तर काही शहरांत लॉकडाऊन (Lockdown) करण्याचे संकेत आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत. दरम्यान, वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार लॉकडाऊनचा विचार करतंय का? अशी विचारणा केली असता केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनी सूचक उत्तर दिले.
आजच्या कॅबिनेट बैठकीनंतर प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे लॉकडाऊन लागणार का, अशी शंका लोकांच्या मनात निर्माण झाली आहे. यावर जावडेकर म्हणाले की, “ज्या राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, गतवर्षी कोरोना व्यवस्थापनाचे उपाय सर्व लोकांनी पाहिले आहेत. आताही व्यवस्थापन रोग्य रीतीने झाले तर कोरोनाचा फैलाव होणार नाही.”
दरम्यान, कोरोना लसीकरणाबाबत केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार देशभरात सुरू झालेल्या कोरोना लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे. बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, येत्या १ एप्रिलपासून देशातील ४५ वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला कोरोना लस देण्यात येणार आहे. भारताकडे कोरोनावरील लसीचे पुरेसे डोस आहेत. तसेच अनेक लसी चाचणीच्या टप्प्यात आहेत, असेही जावडेकर यांनी सांगितले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला