मोदी सरकारचा कोरोना रुग्णांना मोठा दिलासा, रेमडेसिवीर इंजक्शन केले स्वस्त

PM Modi-Remdesivir

नवी दिल्ली :- कोरोनाच्या दुसर्‍या लाटेतही मोदी सरकारनं दिलासादायक बातमी दिलीय. कोरोनाच्या (Corona) कोट्यवधी रुग्णांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे, खरं तर सरकारने कोरोनाच्या उपचारात उपयुक्त असलेल्या रेमिडिसीवीरच्या किमतीत सुमारे ५० टक्क्यांनी कपात केली आहे. रेमडेसिवीरचं उत्पादन घेणाऱ्या देशातील ७ प्रमुख औषध कंपन्यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनच्या (Remdesivir Injuction) किमती मोठ्या प्रमाणात कमी केल्या आहेत.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकानुसार सांगण्यात आले आहे की, देशात रेमिडिसीवीरचे सात उत्पादक असून, त्यांची क्षमता दरमहा सुमारे ३८.८० लाख युनिट आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार औषध निर्मिती विभाग देशातील उत्पादकांच्या संपर्कात असून, औषधाचे उत्पादन वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. रसायन आणि खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी शुक्रवारी सांगितले की, देशातील उपलब्धता वाढविण्यासाठी रेमिडिसीवीरचे उत्पादन वाढविण्यासाठी सरकार सर्व पावले उचलत आहे. ते म्हणाले की, गेल्या पाच दिवसांत एकूण ६.६९ लाख इंजेक्शनच्या शिशी विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना उपलब्ध करून देण्यात आल्यात. गौडा यांनी ट्विट करत ही माहिती दिली.

रेमिडिसीवीरच्या उत्पादन सुविधांचा विस्तार करण्यासाठी आणि त्यांची क्षमता, उपलब्धता वाढविण्यासाठी सरकार सर्व आवश्यक पावले उचलत आहे. दुसर्‍या ट्विटमध्ये गौडा म्हणाले, “सरकारच्या हस्तक्षेपानंतर रेमिडिसीवीर प्रमुख उत्पादकांनी १५ एप्रिल २०२१ पासून स्वेच्छेने त्याची किंमत ५,४०० रुपयांवरून ३,५०० रुपयांपेक्षा कमी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या कोरोनाविरुद्धच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button