मोदी सरकार नफेखोरी वाढवण्याचे काम करते; पी. चिदंबरम यांची टीका

PM Narendra Modi - P. Chidambaram

नवी दिल्ली : कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेनंतर देशात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण बनत चालले आहे. कोरोना लसीचा (Coronavirus Vaccination) तुटवडाही अनेक राज्यांमध्ये जाणवू लागला आहे. देशातील दोन कंपन्यांच्या लसीच्या डोसचे उत्पादन देशवासीयांच्या क्षमतेपेक्षा खूपच कमी असल्याने परदेशी लसींना परवानगी देण्यात आली आहे. काँग्रेस (Congress) नेत्याकडून लसीकरणाबाबत केंद्र सरकारवर (Central Government) टीकास्त्र सोडण्यात आले आहे.

काँग्रेस नेते पी. चिदंबरम (P. Chidambaram) यांनी कोरोना लसीकरणावरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. कोरोना लसींच्या किमती केंद्र सरकारकडून निश्चित केल्या जात नाही. एकंदरीत या घटनांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार (Modi Government) कोरोना लसींच्या किमतीवरून नफेखोरी वाढवण्याचे काम करत आहे, तसेच राज्य सरकारलाही त्या पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत, अशी टीका चिदंबरम यांनी केली.

राज्यांना मोठे नुकसान
एकीकडे राज्यांचे महसुली उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घटले आहे. यांना जीएसटीचा वाटा केंद्राकडून दिला जात नाही. मर्यादित संसाधने असणाऱ्या छोट्या राज्यांना मोठे नुकसान होत आहे. राज्यांची कर्जे वाढत आहेत. तर दुसरीकडे कोरोना लसींचे डोस निश्चित किमतीत मिळत नाही आहेत, असा दावा चिदंबरम यांनी केला आहे.

PM केअर फंडाच्या रकमेचे काय?
पी. चिदंबरम यांनी PM केअर फंडावरूनही मोदी सरकारवर निशाणा साधला. PM केअर फंडात जमा झालेल्या कोट्यवधी रकमेचे नेमके काय झाले, याची माहिती कोणालाही नाही, असा टोला चिदंबरम यांनी लगावला. दरम्यान, आता १ मेपासून देशातील १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी केंद्राने १ मेपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बड्या फार्मा कंपन्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button