विजयाराजे शिंदे यांच्या सन्मानार्थ मोदी सरकार काढणार १०० रुपयांचे नाणे

विजयाराजे शिंदे

दिल्ली : भाजपाच्या (BJP) नेत्या राजमाता विजयाराजे शिंदे (Vijaya Raje Scindia) यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त, त्यांच्या सन्मानात सरकार १०० रुपयांचे नाणे काढणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ ऑक्टोबर रोजी या नाण्याचे अनावरण करणार आहेत.

शिंदे राजघराण्यातील सदस्याच्या सन्मानार्थ नाण्याचे अनावरण होणार असल्याच्या घोषणेनंतर राजमातांची कन्या यशोधराराजे (Yashodhara Raje) यांनी ट्विट करून आनंद व्यक्त केला आहे.

१०० रुपयांचे हे नाणे चार धातूंच्या मिश्रणातून तयार करण्यात आले आहे. ३५ ग्रॅम वजनाच्या या नाण्यात ५० टक्के चांदी व ५० टक्के इतर धातू आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER