मोदी सरकार प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख टाकण्याचे आश्वासन पूर्ण करणार : आठवले

Ramdas-Athawale

सोलापूर :- सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारने प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये टाकण्याचे आश्वासन दिले होते . आता ते आश्वासन पूर्ण होणार असून जीएसटीचा कर कमी करणे, पेट्रोलियम पदार्थाचे दर आणि महागाई कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोलापुरातील पत्रकार परिषदेत दिली.

गरजू तरुणांना शिष्यवृत्तीत वाढ करण्याचा मुद्दा एनडीएच्या बैठकीत आपण मांडला असल्याची माहिती आठवले यांनी दिली. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकालानंतर भाजपाला बहुमताचा आकडा सिद्ध करता आला नाही . मध्य प्रदेश व छत्तीसगड या राज्यात भाजपची १५ वर्षे सत्ता होती म्हणून लोकांनी बदल केला आहे. तर राजस्थानमध्ये दर ५ वर्षांनी सत्ता बदलण्याचे सत्र सुरवातीपासूनच सुरु आहे . मध्य प्रदेश , छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यांमध्ये काँग्रेसचा विजय झाला असून राहूल गांधीचा नाही किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींही हरले नाहीत . राफेल कराराबाबत काँग्रेसने खोटी माहिती पसरवली . तसेच त्यांनी सर्वसामान्य जनतेची दिशाभूलही केली आहे . आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर एनडीएचेच सरकार येईल आणि मोदीच पंतप्रधान होतील. तामिळनाडूमध्ये स्टॅलिन म्हणाले राहूल पंतप्रधान होतील. पण, इतरांचा त्याला विरोध असून महाआघाडी झाल्यास त्यांच्या नावावर एकमत होणार नाही. पुढील दहा वर्षे मोदीच पंतप्रधान राहणार असल्याचा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला .

ही बातमी पण वाचा : ‘पप्पू’ नहीं, अब ‘पप्पा’ हो गए हैं राहुल गांधी : आठवले