मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट : शरद पवार

Sharad Pawar-Maratha Resrvation

मुंबई :- मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad pawar) यांनी मराठा आरक्षणाविषयीही भूमिका स्पष्ट केली. मराठा आरक्षणासाठी तातडीने सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याची गरज होती . त्यामुळे मी दिल्लीला गेलो नाही. मराठा आरक्षणप्रश्नी तरुणांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे हे आरक्षण टिकलं पाहिजे. मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवली पाहिजे ही सर्वांचीच भूमिका असून सरकारनेही भूमिका स्पष्ट केली आहे, असेही पवार म्हणाले.

मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. ही स्थगिती उठवण्यासाठी ठाकरे सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयात काल विनंती अर्ज दाखल करण्यात आला आहे. मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती मिळाल्याने ठाकरे सरकारवर टीका झाली होती. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  (uddhav Thackeray) यांनी लवकरच यातून मार्ग काढू असे आश्वासन दिले. तसेच मराठा बांधवांच्या मागण्यांच्या पाठीशी आम्ही कायम आहोत असेही म्हटले होते. त्यानुसार आज अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी सुप्रीम कोर्टात विनंती अर्ज दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER