मोदी सरकारने माघार घेऊ नये; शेतकऱ्यांच्या आंदोलनावर मनसे नेत्याची मागणी

PM Modi-Anil Shidore

मुंबई :- कृषी कायद्याविरोधात मनसेच्या नेत्यांनी विरोधात भूमिका घेतली आहे. सरकारने जर निर्णय मागे घेतला तर आपण १० वर्षे मागे जाऊ, असे मत मनसेचे नेते अनिल शिदोरे (Anil Shidore) यांनी मांडले आहे. शिवसेनेनं शेतकरी आंदोलनात उडी घेत जाहीर पाठिंबा दिला आहे.

त्यामुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र त्यापूर्वी मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी ट्विट करून शेतकरी आंदोलनाबद्दल आपली भूमिका मांडली आहे. ‘आपण वर्षानुवर्ष पाहिलं की कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मक्तेदारी हीच शेतकरी वर्गावर अन्याय करते आहे.

त्याचा बीमोड करायचा म्हणून संसदेत तीन कृषीविषयक कायदे मंजूर झाले.  आता इथून सरकारने माघार घेतली तर शेतकरी पुन्हा भ्रष्टाचारी व्यवस्थेत भरडला जाईल.  सरकारने माघार घेऊ नये.’ अशी मागणीच शिदोरे यांनी केली. शेतीचं भलं खुल्या बाजाराशी जोडलं जाण्यात आहे. ती दिशा आहे.

ज्या कायद्यांविरोधात दिल्लीत आंदोलन चालू आहे, ते कायदे त्याच दिशेनं जाणारे आहेत. त्याच्या अंमलबजावणीच्या बाबतीत काही सुधारणा करता येतील. परंतु आज माघार घेतली तर देशातील एकूण आर्थिक सुधारणांबाबत आपण १० वर्षे मागे जाऊ, असे मतही शिदोरे यांनी व्यक्त केले.

:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER