मोदी सरकारने खतांवरील अनुदान वाढवले; शेतकऱ्यांना मिळणार जुन्या किमतीत

Maharashtra Today

दिल्ली :- खतांच्या दरवाढीला झालेल्या विरोधानंतर केंद्र सरकारने खतांचे दर ‘जैसे थे’ ठेवण्याचा घेतला. आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती वाढल्या (Modi government increases fertilizer subsidy)असल्या तरी सरकारने शेतकऱ्यांना (Farmers) जुन्या दरानेच खत देण्याचा निर्णय घेतला, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) ही घोषणा केली.

केंद्र सरकारने डाय-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) खतावरील (DAP Fertilizer) अंशदानात ५०० रुपयांवरून १२०० रुपयांपर्यंत वाढ केली आहे. मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे DAP च्या आंतरराष्ट्रीय बाजारभावांमध्ये वाढ झाली असली तरी ती केवळ १२०० रुपयांच्या जुन्या दराने शेतकऱ्यांना मिळतील. केंद्र सरकारने दरवाढीचा संपूर्ण भार सोसण्याचा निर्णय घेतला आहे.

आतापर्यंत प्रति बॅग अनुदानाचे प्रमाण एकाच वेळी इतके कधीचा वाढविण्यात आले नाही. मागील वर्षी डीएपीची वास्तविक किंमत प्रति बॅग १,७०० रुपये होती. ज्यात केंद्र सरकार प्रति बॅग ५०० रुपये अनुदान देत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति बॅग १२०० रुपये किमतीत खत मिळत होते.

DAP मध्ये वापरल्या जाणार्‍या फॉस्फोरिक अॅसिड, अमोनिया इत्यादी आंतरराष्ट्रीय किमती नुकत्याच ६० % वरून ७० % पर्यंत वाढल्यात. या कारणास्तव डीएपी बॅगची वास्तविक किंमत आता २४०० रुपये आहे, ते खत कंपन्या ५०० रुपयांच्या अनुदानावर १९०० रुपयांना विकतात. आजच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना डीएपी खताच्या पिशव्या फक्त १२०० रुपयांमध्ये मिळतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button