मोदी निव्वळ आश्वासने देतात, मदत नाही; प्रशांत किशोरांची टीका

PM Narendra Modi - Prashant Kishor

पाटणा : राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी केंद्राच्या धोरणांवर जाहीरपणे टीका केली आहे. कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी सरकार योजना राबवत आहे. या योजनेवरून त्यांनी निशाणा साधला.

“मोदी सरकारकडून (Modi Government) आणखी एक मास्टरस्ट्रोक. कोरोना (Corona) आणि त्याच्या व्यवस्थापनात ढिसाळ नियोजनाने अनाथ झालेल्या मुलांना सहानुभूती दाखवली जात आहे. यावेळी मुलांना अधिक मदतीची गरज आहे. त्यांना १८ व्या वर्षी स्टायपेंड देण्याचे आश्वासन देत आहे. याबाबत त्यांना सकारात्मक वाटेल का? असा प्रश्न करताच मोफत शिक्षणासाठी पीएम केअरचे आभारी आहोत. ५० कोटी भारतीयांच्या आरोग्यासंबंधी गरजा पूर्ण करण्यासाठी ‘आयुषमान भारत योजने’त नोंदणी केल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार… पण वेळेवर ऑक्सिजन आणि बेड उपलब्ध करून देण्यात सरकार अपयशी ठरले.” अशी टीका त्यांनी केली.

मुले देशाचे भवितव्य : पंतप्रधान
कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी केंद्राने काही योजनांची घोषणा केली आहे. त्यानुसार अनाथ मुलांना १८व्या वर्षी मासिक आर्थिक मदत आणि २३व्या वर्षी पीएम केअर्स फंडातून १० लाख रुपये मिळतील. “मुलं देशाचे भवितव्य आहेत. सरकार त्यांना मदत आणि त्यांचे संसक्षण करून सर्व सहकार्य करेल. ते चांगले नागरिक होतील आणि त्यांचे भवितव्य उज्ज्वल असेल.” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button