मोदी सरकारला ८० वर्षांच्या शरद पवारांची जास्त भीती – धनजंय मुंडे

Dhananjay Munde-sharad pawar

पुणे :- राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhanjanya Munde) यांनी कृषी कायद्याबाबत भाष्य करताना केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला. देशातील मोदी सरकारमधील नेत्यांना २५ वर्षांच्या  एखाद्या नेत्याची भीती असते, अगदी तशीच भीती ८० वर्षांच्या शरद पवार (Sharad Pawar)यांची आहे. होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं हे आपण ऐकतो, ते शरद पवार साहेबांनी सत्यात उतरवून दाखवलं. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ज्या पद्धतीने भाजप बदनाम करत आहे, ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. शेतकरी जगला तर आपण जगू म्हणून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्या, आणि शेती करत नसला तरीही पाठिंबा द्यावा, असे  आवाहन धनजंय मुंडे यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार डॉ.अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या शिरूर लोकसभा मतदारसंघात मोफत श्रवणयंत्र वाटप शिबिराचे  उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारवर टीका केली. सत्ता देणाऱ्या जनतेचं म्हणणं ज्यांना श्रवणातून ऐकू येत नसेल त्यांना श्रवणाखाली द्यायला हवी? कारण, त्याची मशीन अद्याप निर्माण झालेली नाही, अशा वेळी हाताचा वापर करावा लागतो, असा टोला मुंडे यांनी लगावला. हे केंद्रातील भाजपाचे सरकार शेतकरी, शेतमजूर, कामगारांच्या विरोधातील आहे. सुरुवातीला विश्वास देतात की आम्ही तुमच्यासोबत आहोत.  मात्र हेच पुन्हा सत्तेत आल्यावर शेतकरी आणि कामगार मजुरांना पायाखाली तुडवतात.

याचा प्रत्यय आता सुरू असलेल्या आंदोलनात दिसून येत आहे. प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्यावर ‘ईडी’ने लावलेल्या चौकशीला कुठलाच आधार नव्हता. आपण एखाद्या व्यक्तीपर्यंत जाऊ शकत नाही म्हणून त्याच्या सहकाऱ्यांपर्यंत जायचं. कुठेही ‘ईडी’चा वापर करायचा. हे जे काही अनेक दिवसांपासून भारतीय जनता पार्टीचं चाललं आहे, ही ‘ईडी’च त्यांना संपविल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका त्यांनी केली. माझ्याकडे दिव्यांगांच्या खात्याची जबाबदारी का देण्यात आली याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. माझा लहान भाऊ मूकबधिर आहे.

याची कल्पना शरद पवार यांना आहे आणि म्हणूनच त्यांनी मला हे खातं दिलं. मी या दिव्यांगांना तळमळीने न्याय देईन, हा त्यांना विश्वास आहे. राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) चांगलं काम करणार असल्याचा विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला.

ही बातमी पण वाचा : काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून घेणार नंतर राज्य सरकार पाडणार; केंद्रीय मंत्र्याचा दावा 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER