मोदी सरकारने शेतकऱ्यांचा केसाने गळा कापला ; शरद पवारांच्या पत्रानंतर शिवसेनेसह सर्व पक्षांनी व्यक्त केला संताप

Maharashtra Today

मुंबई :- देशात एकीकडे कोरोनाचे (Corona) संकट आहे. त्यामुळे सर्वसामान्य अडचणीत सापडला आहे. अशाच प्रकारे आपल्या सर्वांचा पोशिंदा असलेला शेतकऱ्यांची केंद्र सरकार दिशाभूल करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला.

शेतकऱ्यांच्या उत्पन्न दुप्पट करण्याचे आमीष दाखवून केंद्रातील मोदी सरकारने (Modi Govt) शेतकऱ्यांचा केसाने गळा कापला आहे. ऐन पेरणीच्या तोंडावर खतांच्या भावात 55 टक्के भाववाढ करण्यात आली आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये टाकायचे आणि दुसऱ्या हाताने काढून घ्यायचे अशा दुतोंडी भूमिकेमुळे मोदी सरकारच्या विरोधात शेतकऱयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. खताची अन्यायकारक दरवाढ मागे घेण्यात यावी अशी जोरदार मागणी होत आहे. शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायांवर शरद पवारांच्या पत्रानंतर शिवसेनेसह(Shivsena) सर्व पक्षांनी संताप व्यक्त केला आहे .

दरवाढीकडे आपण गांभीर्याने पाहून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी विनंती शरद पवारांनी केमीकल आणि फर्टीलायजर मंत्री सदानंद गौडा यांना पत्र लिहून केली आहे. याबाबत त्यांनी ट्विट करत माहिती दिली.

एकीकडे शेतकऱ्यांना दोन हजार रुपये देण्याची घोषणा करायची आणि दरवाढ करून शेतकऱयांच्या खिशातून काढून घ्यायची, अशा पद्धतीचे अतिशय अन्यायकारक आणि दुटप्पी धोरण केंद्र शासनाने राबवले आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी दिली आहे. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय खत व रसायन मंत्र्यांना पत्र लिहिले असून हजारो शेतकऱयांचे निवेदनही पंतप्रधानांना पाठविण्यात येणार असल्याचे हेमंत पाटील म्हणाले. कोरोना काळात शेतकऱ्यांचा आक्रोश पाहून ही दर वाढ रोखायला हवी, अशी मागणी केली.

तसेच गेले वर्षभर कोरोना महासाथ आणि अन्य नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. अशातच खत उत्पादक कंपन्यांनी खताची किंमत वाढविल्यास शेतकऱ्यांसाठी अधिकच नुकसानकारक ठरेल. मान्सून काही दिवसांवर आला असून शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीसाठी तयारी सुरू केली आहे. हे ध्यानात घेता पेंद्र सरकारने शेतकऱयांना खताच्या खरेदीसाठी लवकरात लवकर अनुदान घोषित करावे, अशी मागणी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

ही बातमी पण वाचा : हे तर शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणे; खतांच्या दरवाढीने शरद पवार संतापले 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button