मोदींनी देशाला तीन ‘चि’ दिलेत, देश वाचवायला काँग्रेस सक्षम आहे : नाना पटोले

Nana Patole - Congress - PM Narendra Modi

मुंबई : भारताला एक समृद्ध राष्ट्र म्हणून उभे करण्यात काँग्रेस (Congress) पक्षाचा मोठा वाटा राहिला आहे. मागील ७ वर्षात देशाच्या लौकीकाला काळीमा फासण्याचे काम भाजपा (BJP) सरकारने केले आहे. कोरोनाच्या (Corona) महामारीत तर मोदी सरकारने (Modi Government) देशातील जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार अपयशी ठरले. त्यांनी जनतेला फक्त ‘चीनचा कचरा, चिंता व चिता’, हे तीन ‘चि’ दिले आहेत, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली. त्याचबरोबर, ‘महाविकास आघाडी ही देशातील एक आदर्श आघाडी आहे. या आघाडीचा आत्मा नक्कीच काँग्रेस पक्ष आहे. काँग्रेस पक्षाशिवाय कोणतीही आघाडी होऊ शकणार नाही,’ संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या या वक्तव्यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“यूपीए आधीपासूनच अस्तित्वात आहे आणि त्यातील प्रमुख पक्ष काँग्रेस आहे. कोणी यूपीए मध्ये येऊ इच्छित असेल, तर त्यांचे स्वागतच आहे. पण कोणी तिसरी आघाडी काढायला निघाले असेल, तर तो त्यांचा प्रश्न आहे. आम्हाला देश वाचवायचा आहे आणि देश वाचवायला काँग्रेस सक्षम आहे, ‘यूपीए’चे दार खुले आहे. जे येतील त्यांचे स्वागत आहे. मी संजय राऊतांना धन्यवाद देतो, त्यांना ही जाणीव झाली, की काँग्रेसच ‘यूपीए’चा आत्मा आहे. कारण लोकांच्या जिविताचे रक्षण करणे, ही काँग्रेसची भूमिका आहे आणि भविष्यातही राहणार आहे.” असा टोला नाना पटोले यांनी राऊतांना लगावला आहे.

कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकारला अपयश आले आहे. त्यांनी जनतेला फक्त ‘चीनचा कचरा, चिंता व चिता’ हे तीन ‘चि’ दिले आहेत. यांच्या अहंकारामुळे देशातील जनता होरपळून निघत आहे. सुप्रीम कोर्टाला यात हस्तक्षेप करावा लागला आणि त्यांनीच टास्क फोर्स नेमला. पंतप्रधान मोदी कोणाचेही ऐकत नाहीत. त्यांनी लसीकरणाचा सावळा गोंधळ करून ठेवला आहे. १३० कोटी जनतेसाठी सरकारने घरोघरी जाऊन मोफत लसीकरण करायला हवे होते पण त्यांनी ते केले नाही. भारतातील लोकसंख्या विचारात घेता ३०० कोटी लसींची आवश्यकता आहे. ती लवकर पूर्ण होणे अवघड आहे, असे नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

“देशात अन्नधान्याची टंचाई असताना काँग्रेस सरकारांनी हरितक्रांती, श्वेतक्रांती करून देशाला स्वयंपूर्ण बनवले. २००८ च्या जागतिक मंदीचे चटके जग सहन करत आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि लोकांना याची झळ बसू दिली नाही. ज्यांनी अच्छे दिन, विश्वगुरु, महासत्ता बनविण्याचे स्वप्न दाखवले त्यांनी देशाच्या एकता आणि अखंडतेला धोका पोहोचवला आहे. देशाला या संकटातून बाहेर काढून पुन्हा उभे करण्याची क्षमता फक्त काँग्रेसमध्येच आहे.” असे नाना पटोले म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button