प्रत्येक जिल्ह्याची वेगळी आव्हाने; मोदींनी दिला जिल्हाधिकाऱ्यांना कोरोना रोखण्याचे मंत्र

PM Modi

नवी दिल्ली :- देशात कोरोना (Corona Virus) विषाणूच्या साथीचे थैमान सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी आज जिल्हाधिकारी, स्थानिक प्रशासनाचे अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी मोदींनी जनतेला बेड्स आणि इतर आवश्यक गोष्टी आणि औषधांचा काळाबाजार रोखण्याच्या सूचना केल्या. जिल्हा जिंकला तर देश जिंकेल, याचे भान ठेवून काम करा, असे मोदींनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ४६ जिल्ह्यांमधील जिल्हाधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाही (Amit Shah) उपस्थित होते. या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जिल्हाधिकाऱ्यांना टेस्टिंग, कंटेन्मेंट आणि लसीकरणाबाबत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. कोरोना काळात अनेकांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना गमावले आहे. यामुळे लोकांना आणखी त्रास होणार नाही, याची काळजी घ्या. लोकांना योग्य आणि अचूक माहिती द्या. रुग्णालयात किती रिकामे बेड आहेत. औषधांचा पुरवठा किती आहे, याची अचूक माहिती लोकांना द्या, असे मोदी म्हणाले.

प्रत्येक जिल्ह्याचे वेगवेगळी आव्हाने

आपल्या देशात जेवढे जिल्हे आहेत. तेवढीच वेगवेगळी आव्हाने आहेत. प्रत्येक जिल्ह्याची वेगवेगळी आव्हाने आहेत. तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील आव्हाने चांगल्या पद्धतीने माहिती आहेत. त्यामुळे जेव्हा तुमचा जिल्हा जिंकतो. तेव्हा तुमचा देशही जिंकतो. हेच गाव कोरोनामुक्त करतील हे लक्षात ठेवा. त्यातील नवीन गोष्टी इतर जिल्ह्यातही लागू करता येतील. प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळे आव्हान आहे. तुमचा जिल्हा जिंकला तर देश जिंकेल. गावागावात हा संदेश गेला पाहिजे. तेच आपलं गाव कोरोनामुक्त करतील, असे मोदी म्हणाले.

दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात झालेल्या मोठ्या प्रमाणावरील संसर्गामुळे तज्ज्ञ चिंतीत आहेत. याबाबत पंतप्रधान म्हणाले की, “या दुसऱ्या लाटेमध्ये सध्या ग्रामीण आणि दुर्गम भागांवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाच्या ‘ईज ऑफ लिव्हिंग’वरही लक्ष ठेवावे लागेल.”

ही बातमी पण वाचा : भविष्यासाठी मोदी सिस्टिमला झोपेतून उठवणे आवश्यक; राहुल गांधींचे मोदी सरकारवर शाब्दीक हल्ले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button