मोदी, शाह आले तरी जागा मिळणार नाही, त्यांनी वेळ वाया घालवू नये; काँग्रेसचा टोला

PM Modi-Amit Shah

तिरुअनंतपुरम : केरळमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. ६ एप्रिलला मतदान होणार आहे. सध्या लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट सत्तेत आहे. निवडणुकीपूर्वी होत असलेल्या सर्व्हेमध्ये डाव्या पक्षांची सत्ता येण्याचा अदांज वर्तवली आहे. दुसरीकडे काँग्रेस नेत्यांनी सर्व्हेचा अंदाज फेटाळला. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथला (Ramesh Chennithala) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(Amit Shah) आले, तरी भाजपला (BJP) एकही जागा मिळणार नाही, असा दावा केला आहे.

मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचे सरकार भ्रष्टाचाराचे आहे. डाव्या पक्षांच्या सरकारविरोधात लोकांमध्ये संताप आहे. आम्ही पुन्हा सत्तेत येऊ, असा विश्वास विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथला यांनी व्यक्त केला. केरळमध्ये भाजप यश मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. रमेश चेन्निथला यांनी भाजपचा प्रचार करण्यासाठी मोदी आणि शाह आले, तरी त्यांना एकही जागा मिळणार नाही, असा दावा त्यांनी केला. भाजपला केरळमध्ये यश मिळणार नाही, त्यांनी वेळ वाया घालवू नये, असे चेन्नितला म्हणाले. आमची मुख्य लढाई डाव्या पक्षांसोबत असल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेसकडून नव्या उमेदवारांना संधी

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने तरुण आणि नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. याबाबत रमेश चेन्नितला सांगतात की, काँग्रेसमध्ये शांततेत क्रांतीकारक बदल होत आहेत. यामुळे काँग्रेसने १६० जागांपैकी ५५ जागावंर नव्या उमेदवारांना संधी दिली. विधानसभा निवडणुकीत भ्रष्टाचार हा प्रमुख मुद्दा काँग्रेसने बनवला आहे. केरळमध्ये सत्तेत आल्यास न्याय योजना लागू करण्याचे आश्वासनही दिले आहे. केरळमध्ये राहुल गांधी आणि प्रियांका गांधी काँग्रेससाठी स्टार प्रचारक आहेत.

केरळच्या १६० जागांसाठी ६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. केवळ एकाच टप्प्यात मतदान होणार असून २ मे रोजी निकाल जाहीर होणार. त्यामुळे जनता कोणाच्या पारड्यात मतदान करणार हे पाहणे महत्त्वाचे राहणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER