
तामिळनाळू : पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये प्रचारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी आता आपले लक्ष दक्षिण भारताकडे वळवले आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडूमधील ४ निवडणूक प्रचार सभांमध्ये मतदारांना संबोधित करतील. तामिळनाडूत दाखल झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी मदुराईच्या मिनाक्षी देवीचे दर्शन (Darshan of Goddess Meenakshi of Madurai) घेतले.
आज नरेंद्र मोदींच्या प्रचारसभेत तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई.के पलानीस्वामींसह इतर नेतेदेखील उपस्थितीत राहणार आहे. जनतेला संबोधित केल्यानंतर ते केरळमधील पथानामथिट्टामध्ये निवडणूक सभा घेणार आहेत. त्यांनतर संध्याकाळी ४ वाजता मोदी कन्याकुमारी येथे प्रचारसभेत सहभागी होऊन जनतेला संबोधित करतील. यानंतर मोदी पुन्हा केरळला जाणार असून संध्याकाळी ६ वाजता तिरूअनंतपुरममध्ये जनसभेला संबोधित करणार आहेत.
तामिळनाडू आणि केरळमध्ये ६ एप्रिल रोजी विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. मोदींनी १ एप्रिलला तीन प्रचार सभेत हजेरी लावली. याशिवाय मोदी ३६ तासांत ५ हजार किमीपेक्षा अधिक प्रवास करणार असून ते चार राज्यांत प्रचार करणार असल्याचे सांगितले जात आहे.
Prayed at the Madurai Meenakshi Amman Temple. pic.twitter.com/ZUDRIZavDH
— Narendra Modi (@narendramodi) April 1, 2021
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला