मोदी देशभक्त आणि देशद्रोहींमधील फरक ओळखू शकले नाही : प्रियांका गांधी

दिल्ली : काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या की, “जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोनदा निवडणून दिले. कारण जनतेला त्यांच्याकडून अपेक्षा होत्या. मोदी वारंवार रोजगार आणि शेतकऱ्यांविषयी बोलले. मात्र त्यांच्या हिताच्या कोणत्याच गोष्टी घडताना दिसत नाही.”

उत्तर प्रदेशमधील बिजनौर येथील शेतकरी महापंचायतीला संबोधित करताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, “२०१७ पासून येथे उसाचे दर वाढलेले नाहीत. मोदी यांनी शेतकर्‍यांची थकबाकी अद्याप दिली नाही. स्वत:साठी १६ हजार कोटींचे विमान खरेदी केले.” कृषी कायद्यांबद्दल बोलत असताना त्या म्हणाल्या की, “मोदी सरकारच्या या नवीन कायद्याचा फायदा फक्त उद्योगपतींनाच होणार. मोदी अमेरिका, चीन आणि पाकिस्तानला जाऊ शकतात, मात्र दिल्लीत बसलेल्या शेतकऱ्यांना भेटू शकत नाहीत. मोदींनी शेतकऱ्यांची चेष्टा केली आणि त्यांना आंदोलनजीवी-परजीवी असे म्हटले आहेत. मोदी देशभक्त आणि देशद्रोहींमधील फरक ओळखू शकले नाही.” असे प्रियांका गांधी यांनी म्हटले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER