मोदींनी २४ तासातच सर्जिकल स्ट्राईक केला, पण राज्यपालांचे संशोधन सुरूच; राऊतांचा घणाघात

Sanjay Raut - Governor Bhagat Singh Koshyari

मुंबई :- विधानपरिषदेत राज्यपालांनी नेमलेल्या १२ आमदारांची नावे अद्याप राज्यपालांना मंजूर झाली नसल्यामुळे आघाडी सरकार आणि राज्यपाल यांच्यात तणाव आहे. विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीवरून शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदींनी सर्जिकल स्ट्राईकही (Surgical Strike) २४ तासांत पूर्ण केला होता. पण ६ महिने उलटूनही राज्यपालांचे नामनियुक्त सदस्यांच्या नियुक्तीबाबत संशोधन सुरूच असल्याचा टोला संजय राऊतांनी लगावला.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून आधी राज्यपाल कोश्यारींवर टीका केली. ६ महिने झाले. मात्र, त्या फाईलवर अद्यापही निर्णय नाही. राज्यपालांचे कोणते संशोधन सुरू आहे? मोदींनीही २४ तासात सर्जिकल स्ट्राईक केला होता. पण याबाबत राज्यपालांना निर्णय घेता येत नाही, असा टोमणा राऊतांनी मारला. ते पुढे म्हणाले की, १२ सदस्याचे सदस्यत्व रोखून ठेवणे हा घटनेचा भंग आहे. यात राजकारण असून महाराष्ट्रावर अन्याय आहे. राजभवनात वादळ आलं असावं आणि त्या फाईल उडून गेल्या असाव्यात. नाहीतर, कदाचित भूतप्रेतांनी त्या फाईल गायब केल्या असाव्यात.”

ही बातमी पण वाचा : ‘राज्यपालांना विमानातून उतरवणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी राज्यघटना शिकवू नये’, भाजपची टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button