मोदींकडून मुख्यमंत्री ठाकरेंच्या कार्याचे कौतुक, तर मुख्यमंत्री म्हणाले…

CM Uddhav Thackeray - PM Narendra Modi

मुंबई : कोरोनाच्या (Corona) संकटकाळात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आजवरचे सर्वात निष्क्रीय मुख्यमंत्री आहेत. ते मातोश्री निवासस्थानाच्या बाहेर पडत नाहीत, असे अनेक आरोप भाजपचे (BJP) राज्यातील नेते करत असताना खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी त्यांच्या कार्याचं कौतुक केले आहे. राज्यात करोनाकाळातही या महासंकटाशी लढा देत विकासाची कामे कशी सुरू होती, याचा लेखाजोखाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे मांडला.

करोना संसर्गाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी महाराष्ट्रातील स्थितीची सर्वंकष माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधानांपुढे ठेवली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यात राबवण्यात येत असलेल्या ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ योजनेची माहिती पंतप्रधान मोदींनी दिली. माझं कुटुंब, माझी जबाबदारीसारख्या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही कोविडची लढाई अधिक आक्रमकपणे लढत असून त्याचा परिणाम येणाऱ्या काळात दिसून येईल. मृत्यू दर आणि कोविड (COVID-19) पॉझिटिव्हिटी दर कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना सांगितलं.

मुख्यमंत्र्यांनी मास्कची सवय कशी लावून घ्यावी याविषयी बोलताना चष्म्याच्या सवयीचे साधे उदाहरण दिले. ते म्हणाले, पूर्वी जेव्हा चष्मा वापरायला सुरुवात झाली त्यावेळी त्याचा लोकांना खूप त्रास झाला. तो घालणे चेहरा आणि नाकासाठी अडचणीचे झाले असणार, पण नंतर तो इतका सवयीचा भाग झाला आहे की आज त्याचा त्रास होत नाही.

पंतप्रधानांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं हे उदाहरण इतकं आवडले की त्यांनी बैठकीच्या समारोपाच्या भाषणात या उदाहरणाचा उल्लेख केला. तसेच पुढील काळात मास्क ही आपली अपरिहार्यता आहे असं इतर मुख्यमंत्र्यांना सांगितलं. तसेच पंतप्रधान मोदी म्हणाले, महाराष्ट्रातील नागरिक बहादुरीने कोरोनाचा सामना करते आहेत. कोरोनाचा संसर्ग जास्त असलेल्या महाराष्ट्रातील २० जिल्ह्यांमध्ये विशेष पथकांची नियुक्ती करुन संसर्ग कमी करता येईल. यामुळे देशाच्या कोरोना आकडेवारीवरही परिणाम होईल.

ही बातमी पण वाचा : नवरात्र, दूर्गापूजा, विजयादशमी साधेपणाने साजरे करा,मुख्यमंत्र्यांचं आवाहन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER