मोदींकडून महाराष्ट्रावर अन्याय, एकनाथ खडसेंचा आरोप

Eknath Khadse - PM Narendra Modi - Maharashtra Today
Eknath Khadse - PM Narendra Modi - Maharashtra Today

जळगाव : तौक्ते वादळाच्या तडाख्याने गुजरात आणि महाराष्ट्राचे एकसारखेच नुकसान झाले आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ गुजरातचाच पाहणी दौरा केला. गुजरातला एक हजार कोटींची मदतही जाहीर केली. मात्र महाराष्ट्राला एकही रुपयांची मदत केली नाही. हा महाराष्ट्रावर अन्यायच आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला.

जळगाव येथे पत्रकारांशी बोलताना ते खडसे म्हणाले की, नुकत्याच झालेल्या तौक्ते वादळामुळे गुजरात आणि महाराष्ट्राच्या समुद्र किनारपट्टी भागात मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. विशेषतः महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीला याचा सर्वात जास्त तडाखा बसला. पंतप्रधान मोदी यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी केवळ गुजरातमध्ये जाऊन केली. गुजरातला बैठक घेऊन नुकसानीचा आढावा घेतला. त्यानंतर तात्काळ एक हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली. मात्र महाराष्ट्रातला आतापर्यंत काहीही दिले नाही. महाराष्ट्राला मदत अपेक्षित आहे. केंद्र शासनाने याबाबत पुढाकार घेणे अपेक्षीत आहे. नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाल्यास केंद्र व राज्य दोन्ही सरकारकडून मदत मिळण्याची जनतेची अपेक्षा असते. मात्र केंद्र सरकार फक्त गुजरात राज्याला मदत करीत असेल आणि महाराष्ट्राला मदत करीत नसेल तर तो महराष्ट्रातील जनतेवर अन्याय आहे. पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राला त्वरित मदत जाहीर करावी अशी मागणी श्री. खडसे यांनी केली.

राज्यात कोरोनाची दुसरी लाट आता ओसरू लागली आहे. यासंद्रभात प्रशासनाने दिवसरात्र मेहनत घेऊन विविध स्तरावर काम केले आहे. यासंदर्भात रुग्णांची संख्या विचारात घेता केंद्र शासनाच्या मगदतीचे प्रमाण अधिक हवे. विशेषतः रुग्णांसाठी रेमेडीसेव्हर इंजेक्शन पुरवठा वाढवायला हवा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button