लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी मॉडेल पूनम पांडेवर गुन्हा दाखल

model-poonam-pandey-arrested

मुंबई : देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे . बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल पांडेवर लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहितीनुसार , विवारी संध्याकाळी मरिन लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत लावलेल्या नाकाबंदीमध्ये पूनम पांडे आणि तिचा एक मित्र बीएमडब्ल्यू कारने जात असताना पोलिसांनी त्यांना रोखलं. त्यांच्याकडे विचारणा केली असता बाहेर फिरण्याबाबत त्यांना योग्य उत्तरे देता आली नाहीत. यामुळे मरिन लाईन्स पोलिसांनी पूनम पांडे आणि तिचा मित्र सॅम अहमदवर गुन्हा नोंदवून गाडी ताब्यात घेतली. त्यानंतर नोटीस देऊन सोडण्यात आलं.

पूनम पांडे आणि तिच्यासोबत फिरणाऱ्या सॅम अहमद याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या ५१ (बी), २६९ आणि १८८ या कलमाअंतर्ग कारवाई करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मृत्यूंजय हिरेमठ यांनी पीटीआयशी बोलताना दिली. तसंच यासोबत पोलिसांनी तिची बीएमडब्ल्यू ही कारदेखील जप्त केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला