दसरा दिवाळी संपताच मोबाईलच्या किमंतीत वाढ

Mobile Phones

नवी दिल्ली :- दसरा दिवाळीच्या काळात फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉनसारख्या ऑनलाईन कंपन्यांसह मोबाईल विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणावर सवलती दिल्या होत्या. दिवाळी संपल्यानंतर बहुतांश मोबाईल हँडसेटचे दर पूर्ववत झाले आहेत. येत्या काळात त्यात आणखी वाढ होण्याचे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत.

चालू वर्षीच्या दिवाळीत ऑनलाईन माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे मोबाईल हँडसेट विकले गेले. रोख डिस्काऊंटसह विविध बँकांच्या क्रेडिट व डेबिट कार्डांवर दहा ते वीस टक्क्यांपर्यंतची सूट या कंपन्यांनी दिली होती. सण पार पडल्यानंतर हँडसेटचे दर पूर्ववत वाढले आहेत. बाजारातील मोबाईल हँडसेटची मागणी वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर लवकरच हँडसेटच्या किमतीत आणखी वाढ होऊ शकते, असे अभ्यासकांचे मत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER