नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात मोबाईल सापडण्याचं सत्र सुरूच

नाशिक : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात तीन दिवसापूर्वी सराईत गुन्हेगाराकडून ७ मोबाईल सापडले होते. मात्र आता पुन्हा एकदा ८ मोबाईल आढळले आहेत. यामुळं कारागृह प्रशासनाच्या सुरक्षेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे.

अनेक गैरप्रकारांमुळे कारागृह सातत्याने प्रसिद्धीच्या झोतात असून गेल्या काही महिन्यांपासून नेहमीच गैरप्रकार घडत आहेत. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातत्याने कारागृहात मोबाइल सापडत असल्याने यामध्ये कारागृह कर्मचाऱ्यांचाच सहभाग असावा, असाही दाट संशय व्यक्त करून येथील सर्व अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांची बदली करावी अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.