मोबाइल कंपन्या येणार नफ्यात

दरवाढ पथ्यावर पडणार

Mobile companies make profits

मुंबई :- गळेकापू स्पर्धेमुळे तोट्यात जाणाऱ्या मोबाइल कंपन्यांनी अखेर दरवाढीचे हत्यार उपसले. या युद्धात सर्वसामान्य ग्राहक पिसला जात असला तरी त्यामुळे मोबाइल कंपन्या मात्र नफ्यात येणार आहेत.

मोबाइल सेवेची दरवाढ करून ग्राहकांच्या खिशात हात घालणाऱ्या मोबाइल कंपन्या मात्र दरवाढीने मालामाल होणार आहेत. या दरवाढीनंतर मोबाइल कंपन्यांच्या नफ्यात घसघशीत वाढ होईल,असे एका संस्थेच्या सर्वेक्षणात म्हटले आहे. कंपन्यांचा नफा २०२१ मध्ये तब्बल ६० हजार ५७० कोटींपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

शाओमीने आणला अत्याधुनिक ‘के ३०’

मागील तीन वर्षांपासून दूरसंचार सेवाक्षेत्रातील गळेकापू स्पर्धेने बेजार झालेल्या मोबाइल सेवा पुरावठादरांच्या महसुलाला मोठा फटका बसला होता. वाढती कर्जे आणि सरकारला परवाना शुल्क भरावे लागणार असल्याने गेल्याच आठवड्यात व्होडाफोन-आयडिया, एअरटेल, जिओ या प्रमुख कंपन्यांनी सरासरी ४० टक्के दरवाढ लागू केली. या दरवाढीनंतर कंपन्यांचा नफा २०२१ मध्ये तब्बल ६० हजार ५७० कोटींपर्यंत वाढेल, असे क्रिसिल या संस्थेचे म्हणणे आहे.आर्थिक वर्ष २०१९ मध्ये या कंपन्यांना २९ हजार ४५० कोटींचा नफा झाला होता.

व्होडाफोन-आयडिया, एअरटेल आणि जिओ या तीन कंपन्यांनी नुकताच दरवाढ लागू केली. यामुळे मोबाईल सेवा सरासरी ४० टक्क्यांनी महागण्याची शक्यता आहे. यामुळे कंपन्यांच्या महसुलात वाढ होणार असून आर्थिक स्थिती सुधारेल, असा अंदाज व्यक्त झाला आहे. सध्या दूरसंचार कंपन्यांवर चार लाख कोटींचे कर्ज आहे. यामुळे बँका देखील अडचणीत आल्या आहेत. या क्षेत्राची परिस्थिती गंभीर असून जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत व्होडाफोन आयडियाला ५१ हजार कोटींचा तोटा झाला. भारती एअरटेलला २३ हजार कोटींचा तोटा झाला होता.