रत्नागिरीत मोबाईल व्यवसायिकावर गोळीबार

रत्नागिरी/प्रतिनिधी :  मोबाईलचे दुकान बंद करून घरी निघालेल्या रत्नागिरी शहरातील नॅशनल मोबाईलचे मालक, व्यावसायिक मनोहर ढेकणे यांच्यावर शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दोघांनी गोळीबार केला. मनोहर ढेकणे यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे.

आदिवासी विभागात 3 हजार 199 जागांसाठी नोकर भरतीची खोटी जाहिरात

रत्नागिरी शहराच्या आठवडा बाजार येथे मनोहर ढेकणे यांचे नॅशनल मोबाईल नावाचे दुकान आहे. मनोहर ढेकणे रात्री ९ वाजल्यानंतर आपले दुकान बंद करून बंदर रोडवर असलेल्या घराकडे निघाले होते. यादरम्यान दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्यावर गोळीबार केला. नेमक्या किती गोळ्या झाडल्या गेल्या, याची माहिती उपलब्ध झाली नाही. एक गोळी ढेकणे यांच्या पोटात शिरली आहे. थोड्या लांबच्या अंतरावरून गोळी मारण्यात आल्यामुळे ती पोटातून आरपार गेली नाही. ती पोटामध्येच राहिली.

रक्ताच्या थारोळ्यात ढेकणे खाली पडले. आसपासच्या लोकांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर हल्ला करणारे दुचाकीस्वार लगेचच पळून गेले. रत्नागिरीचे उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे यांच्यासह रत्नागिरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.