मनसेच्या रुपाली ठोंबरे पाटील यांना अटक

पुण्याच्या जम्बो कोविड सेंटरच्या अव्यवस्थेविरुद्ध आंदोलन

Rupali Thombre Patil

पुणे : शिवाजीनगर येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये रुग्णांसाठी आवश्यक सोई नाहीत. या सोई निर्माण करा या मागणीसाठी गुरुवारी आंदोलन करण्याऱ्या मनसेच्या महिलाध्यक्ष व माजी नगरसेविका ॲड. रुपाली ठोंबरे – पाटील याना पोलिसांनी अटक केली.

आंदोलनाच्यावेळी सेंटरचे दार बंद करून तैनात बाउन्सरने रुपाली यांना अडवले होते. रुपाली आणि त्यांच्यासोबतचे कार्यकर्ते फाटकावर चढून सेंटरमध्ये घुसले होते. त्यावेळी सेंटरमध्ये विभागीय आयुक्त हजर होते. रुपाली यांनी सेंटरच्या व्यवस्थेबाबत त्यांच्याशी चर्चा केली होती. या संदर्भात रुपाली यांना अटक करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER